arrested Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: अंबरग्रीस तस्करी प्रकरणी मुंबईतील मच्छीमाराला अटक तर फोंड्यात घरमालकाला लुटणारा भाडेकरू जेरबंद

Goa News: मानसवाडा-कुंडई येथील नाईक कुटुंबीयांच्या घरी ही सुमारे साडेचार लाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी झाली होती.

गोमंतक ऑनलाईन टीम

मडगाव: काही दिवसांपूर्वी सांगे पोलिसांनी उघडकीस आणलेल्या महागड्या 'अंबरग्रीस' तस्करी प्रकरणात सांगे पोलिसांनी पेण-मुंबई येथील मच्छीमार सचिन म्हात्रे याला अटक केली आहे. त्याच्यामार्फत पोलिस या तस्करीच्या मुळापर्यंत जाऊ पाहत आहेत.

पोलिस निरीक्षक दितेंद्र नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील मुख्य संशयित योगेश रेडकर याने हा माल म्हात्रेकडून विकत घेतला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात या मालाची किंमत सुमारे १० कोटी रुपये आहे. यापूर्वी अटक केलेला संशयित योगेश आणि आता अटक केलेला संशयित सचिन हे दोघेही मासेमारीच्या व्यवसायात आहेत.

४.५० लाखांचे दागिने लंपास करणारा अटकेत

फोंडा: 'भाडेकरू म्हणून आला आणि घरमालकाला लुटले' असा प्रकार कुंडई येथे घडला. मात्र म्हार्दोळ पोलिसांची सतर्कता आणि तत्परतेमुळे शेवटी संशयिताला २४ तासांच्या आत पकडण्यात यश मिळाले. ही चोरीची घटना काल सोमवारी घडली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, मानसवाडा-कुंडई येथील नाईक कुटुंबीयांच्या घरी ही सुमारे साडेचार लाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी झाली होती. या प्रकरणी या घरात भाडेकरू म्हणून राहणाऱ्या प्रदीप बाबूलाल नावेत (३०, मूळ मध्यप्रदेश) याला पोलिसांनी संशयावरून ताब्यात घेतले असता त्याने चोरीची कबुली दिली. काल नाईक कुटुंबीय घरी नसताना ही चोरी झाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT