drugs Dainik Gomantak
गोवा

Mumbai, दिल्ली पोलिसांची संयुक्त कारवाई; गोव्यात येणारे 30 कोटींचे अमली पदार्थ जप्त

गोव्यासाठी येणारे 30 कोटीचे अमली पदार्थ जप्त

दैनिक गोमन्तक

अमली पदार्थ विरोधी पथकाने नवी दिल्ली आणि मुंबई येथे छापेमारी करत सुमारे 30 कोटी किमतीचे 7 किलो कोकेन जप्त केले आहे. ही कारवाई तीन ठीकाणी करण्यात आली असुन यातील दोन कारवाया नवी दिल्लीतील विमान तळावर तसेच तिसरी कारवाई मुंबईतील मशिद बंदर भागात करण्यात आली आहे.

(Mumbai and Delhi police have jointly seized drugs worth 30 crores coming to Goa )

मिळालेल्या माहितीनुसार मुंबई आणि दिल्ली पोलिसांच्या पथकाने संयुक्तपणे कारवाई करत गोव्यासाठी येणारे सुमारे 30 कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. या कारवाईत पाच जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींनी सोबत असलेले अमली पदार्थ मुंबई मार्गे गोव्याकडे घेऊन जाणार असल्याची कबुली दिली आहे. अशी माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने दिली.

पोलिसांनी संयुक्तपणे तीन ठिकाणी केलेल्या कारवाई पैकी दिल्लीतील टिळक नगर भागात एका महिलेकडून 4.9 किलो कोकेन जप्त केले आहे. तसेच मुंबईतील मशिद बंदर भागात केलेल्या कारवाईत एका हॉटेलमधून ड्रग्ज आणल्याचे निष्पन्न झाले. यात दोन इथिओपियन नागरिकांना पकडण्यात आले आहे. अटक केलेल्यांपैकी चार आफ्रिकन नागरिक असुन एका भारतीय नागरीकाचा यात समावेश आहे.

पुढील तपासानंतर, एका महिलेसह आणखी दोन इथिओपियन नागरिकांना मशिद बंदर येथील हॉटेलमधून पकडण्यात आले. तर दिल्ली येथील विमान तळावर एका ट्रॉली बॅगमधून 2 किलो कोकेनसह प्रवास करणाऱ्या एकाला अटक केली आहे.

अशा प्रकारे तीन ठीकाणी संयुक्त कारवाई करत पोलिसांनी गोव्याकडे मुंबई मार्गे येणारे एकूण, सुमारे 7 किलो वजनाचे आणि सुमारे 30 कोटी रुपयांचे कोकेन ड्रग जप्त केले आहे. या तपासात ताब्यात घेण्यात आलेले संशयित आरोपी हे एकमेकांशी संवाद साधण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि व्हर्च्युअल नंबर वापरत असल्याचेही आढळून आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Betul: उघड्यावर मद्यपान करणाऱ्यांचे गुंडाराज! जाब विचारणाऱ्या पोलिसांवर दगडफेक, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; झारखंडच्या 6 जणांना अटक

Bits Pilani: 'कुशाग्र'च्या मृत्यूमागे एनर्जी ड्रिंक अतिसेवनाचा संशय! व्हिसेरा राखून ठेवला; फुफ्फुस, मेंदूला इजा

Rashi Bhavishya 18 August 2025: व्यवसायात प्रगती,कुटुंबातील मतभेद मिटतील; आर्थिक बाबींमध्ये सकारात्मक बदल होईल

Dance Viral Video: माझ्या डोईवरी भरली घागर रे... कोकणातल्या पोरांचा डान्स पाहून तुम्हीही म्हणाल, 'एक नंबर...'

Vice President Candidate: ठरलं! एनडीए’चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा

SCROLL FOR NEXT