Shaktipeeth Expressway Dainik Gomantak
गोवा

Nagpur Goa Expressway: 'गोवा ते नागपूर' प्रवास होणार फक्त आठ तासात! शक्तिपीठ महामार्गासाठी महाराष्ट्र सरकारच्या हालचाली सुरु

Shaktipeeth Expressway: गोवा ते नागपूर शक्तिपीठ द्रुतगती महामार्गासाठी पर्यावरण दाखला मिळविण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने पर्यावरण मूल्यांकन प्राधिकरणाकडे पुन्हा अर्ज केला आहे.

Sameer Panditrao

Nagpur Goa Shaktipeeth Expressway

पणजी: गोवा ते नागपूर हे अंतर रस्तामार्गे केवळ ८ तासांत कापणे शक्य आहे. गोवा ते नागपूर शक्तिपीठ द्रुतगती महामार्गासाठी पर्यावरण दाखला मिळविण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने पर्यावरण मूल्यांकन प्राधिकरणाकडे पुन्हा अर्ज केला आहे.

महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे सरकारने हा प्रकल्प रद्द करण्यासाठी पर्यावरण दाखल्यासाठी केलेला अर्ज मागे घेतला होता. आता देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर याप्रकल्पाला गती मिळू लागली आहे. हा महामार्ग गोव्याला पत्रादेवी येथे जोडण्यात येणार आहे. यासाठीचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.

महाराष्ट्रातील शक्तिपीठे, काही प्रमुख धार्मिक स्थळे व तीर्थक्षेत्रे जोडणारा हा प्रकल्प हळूहळू मूर्त स्वरूप घेऊ लागला आहे. पर्यावरण दाखल्यासाठी केलेल्या अर्जात वर्धा ते सिंधुदुर्ग या मार्गासाठी अनेक पर्यायी मार्गांचे प्रस्ताव दिले आहेत.

सहापदरी शक्तिपीठ द्रुतगती महामार्गाची लांबी नागपूर-मुंबई महामार्गापेक्षा जास्त असेल. हा महामार्ग ८०२ किलोमीटर लांब आहे, जो ७०१ किलोमीटर लांबीच्या सध्या अंशतः सुरू असलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गापेक्षा अधिक असेल.

सध्या गोव्यातून रस्तामार्गे नागपूरला जाण्यासाठी १८ ते २१ तास लागतात. हे अंतर १ हजार ११० किलोमीटर आहे. पत्रादेवी येथे या महामार्गाची सुरुवात होऊन तो वर्धा जिल्ह्यातील पवनार येथे संपेल.

११ जिल्ह्यांतून जाणार महामार्ग

हा महामार्ग विदर्भ, मराठवाडा आणि कोकणसह ११ जिल्ह्यांतून जाईल. वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, बीड, उस्मानाबाद, सोलापूर, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग हे जिल्हे या मार्गावर असतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT