MP Sushmita Dev

 

Dainik gomantak

गोवा

मेळावली ग्रामबचाव आंदोलन समितीला खासदार सुश्मिता देव यांचा पाठिंबा

जनतेच्या मतदानातून सरकार निर्माण होते आणि तेच सरकार यांचे आंदोलन चिरडण्यासाठी प्रयत्न करते

दैनिक गोमन्तक

गुळेली : शेळ मेळावली आय आय टी आंदोलकांचा विषय आपण राज्यसभेत उपस्थित करणार असल्याची ग्वाही तृणमूल काँग्रेस पक्षाच्या पश्चिम बंगालच्या खासदार सुश्मिता देव यांनी आज गुळेली सत्तरी येथे पंचायत कार्यालयात उपस्थित मेळावली ग्रामबचाव आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांना दिली.

आज गुरुवार दिनांक 30 रोजी मेळावली ग्रामबचाव आंदोलन समितीच्या वतीने सुरु केलेल्या आंदोलनाचा बारावा दिवस होता. आज सकाळी तृणमूल काँग्रेसच्या (Trinamool Congress) पश्चिम बंगालच्या खासदार सुश्मिता देव यांनी आंदोलन (Movement) कर्त्यां महिलांची भेट घेतली. यावेळी तृणमूल काँग्रेस पक्षाचे वाळपई मतदारसंघ (Constituency) प्रमुख दशरथ मांद्रेकर तसेच मेळावली ग्रामबचाव आंदोलन समितीची उन्नती मेळेकर व इतर महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना खासदार देव म्हणाल्या की, जनतेच्या मतदानातून सरकार निर्माण होते आणि तेच सरकार यांचे आंदोलन चिरडण्यासाठी प्रयत्न करते. लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे, मग हे भाजपा सरकार असे का वागते.

भारतीय जनता पक्षाचे (BJP) सरकार मग ते गोव्यातील असो किंवा केंद्रातील दोघेही शेतकऱ्यांच्या विरोधी आहे. शेतकऱ्यांपुढे शरणागती पत्करत केंद्रातील सरकारला (Central Government) आपली बील मागे घ्यावी लागली.

या मेळावलीतील जनतेवर जो अन्याय झाला त्याविषयी राज्यपालापर्यंत हा विषय पोहोचवण्यासाठी आमची पार्टी प्रयत्नरत राहिल, असे त्या म्हणाल्या त्यावेळी दशरथ मांद्रेकर यांनीही आंदोलनकर्त्या ंंना मार्गदर्शन केले. आज बाराव्या दिवशीही महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: खरी कुजबुज; घराबाहेर आले...पोलिस घेऊन गेले...!

Naru In Goa: गोमंतकीयांसाठी धोक्याची घंटा! गोव्यात आढळला खतरनाक 'नारू'; खांडेपार, कुर्टी येथे सापडला जंतू

Tragic Death: काळीज पिळवटले! खेळता खेळता पडला विहिरीत, मृत्यूशी दिली झुंज; 3 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

Zenito Cardozo Case: शिरदोन गँगवॉर प्रकरण! जेनिटोला ‘सुप्रीम’ दिलासा; 3 वर्षांच्या शिक्षेला पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती

Goa Crime: मालमतेच्या वादातून जबरी मारहाण, मृतदेह सापडला गंभीर अवस्थेत; 3 कामगारांना अटक, मुख्‍य सूत्रधार बेपत्ता

SCROLL FOR NEXT