Viriato Fernandes Dainik Gomantak
गोवा

Bhoma Road Issue: भोम रस्‍त्‍याचा विषय नितीन गडकरींकडे नेणार; काँग्रेस खासदार विरियातो

Viriato Fernandes: गरज भासल्यास हा विषय आपण लोकसभेतही उपस्थित करू अशी ग्वाही

गोमन्तक डिजिटल टीम

फोंडा: भोम येथील रस्त्याचा विषय आपण केंद्रीय रस्ते आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे नेणार असल्याचे दक्षिण गोव्यातील काँग्रेसचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी सांगितले. भोम येथील ग्रामस्थांची भेट घेतल्यानंतर त्यांनी गावातून जाणारा रस्ता आणि लोकांचा विरोध यासंबंधीच्या भावना जाणून घेतल्या. गरज भासल्यास हा विषय आपण लोकसभेतही उपस्थित करू, अशी ग्वाही त्‍यांनी दिली.

खासदार विरियातो यांनी आज रविवारी भोम गावाला भेट दिली. सुरूवातीला त्यांनी येथील मंदिरात जाऊन श्रींचे दर्शन घेतले. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, आम आदमी पक्षाचे फोंड्यातील नेते ॲड. सुरेल तिळवे, गाकुवेधचे रामकृष्ण जल्मी, ग्रामस्थांचे प्रतिनिधी संजय नाईक व ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी ग्रामस्थांनी सांगितले की, आम्हाला गावातून चौपदरी रस्ता नको, बगलमार्ग हवा. गाव नष्ट करून आणि येथील प्राचीन मंदिरांचे अस्तित्व धोक्यात आणून आम्हाला विकास नकोच आहे.त्यासाठी बगलमार्ग उभारा अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

कॅ. विरियातो फर्नांडिस (खासदार, दक्षिण गोवा)

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे भाजपचे खासदार असले तरी ते एक चांगले माणूस आहेत. लोकांच्या भावनांचा त्यांना आदर आहे आणि लोकांना नको असेल तर भोम गावातून चौपदरी रस्ता निश्‍चितच होणार नाही. त्यासाठी गरज भासल्यास गडकरी यांच्या भेटीवेळी भोम गावातील शिष्टमंडळही नेऊ. तेथे हा विषय न सुटल्यास लोकसभेत आवाज उठवणार.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mangal Gochar: नशीब बदलणार, गरिबी हटणार! 'या' 5 भाग्यशाली राशींवर होणार पैशांचा पाऊस; 24 जुलैपासून मंगळ देवाचा महाधमाका

WhatsApp Username Feature: व्हॉट्सॲपच्या 'युझरनेम' फिचरने वापरकर्त्यांचा फायदा की सायबर गुन्हेगारांची चांदी?

Goa Politics: राजकारणात 'नव्या' पक्षांचा जुना खेळ

Goa Congress: अमित पाटकर अखेर काँग्रेस भवनात; आवश्यक दस्तऐवज संबंधित पदाधिकाऱ्याकडे सुपूर्द

Durand Cup Football: आशियातील सर्वात जुनी 135 वी 'ड्युरँड कप स्पर्धा' 25 जुलैपासून; पण सलग दुसऱ्या वर्षीही गोव्याचा एकही संघ मैदानात नाही

SCROLL FOR NEXT