uniform civil code Goa
uniform civil code Goa Dainik Gomantak
गोवा

देशात समान नागरी संहिता लागू करण्याच्या हालचाली

दैनिक गोमन्तक

पणजी : देशात गोव्याच्या धर्तीवर समान नागरी संहिता (युनिफॉर्म सिव्हिल कोड) लागू करण्याचा केंद्राचा विचार आहे. यासाठीच केंद्र सरकारच्या संसदीय समितीने गोव्याच्या समान नागरी संहितेचा आढावा घेतला आहे, अशी माहिती विधानसभा सूत्राने दिली आहे.

गोव्याच्या समान नागरी कायद्यानुसार राज्यातील सर्वच नागरिकांना त्यांचा धर्म, वंश, जात आणि लिंग यावरून कोणत्याच प्रकारचा भेदभाव करता येत नाही आणि सर्वांना समान हक्क, अधिकार मिळतात. हा कायदा देशभर लागू झाल्यास देशातील सर्वच नागरिक एका समान कायदेशीर न्यायप्रक्रियेमध्ये गुंफले जातील असा विचार आहे. राज्यसभेमध्ये कायदामंत्री किरेन राजीजू यांना यापूर्वी लेखी प्रश्न विचारला असता याबाबत केंद्र सरकार सध्या तरी असा कायदा लागू करण्याचा विचार करत नसल्याचे सांगितले होते. मात्र, केंद्र सरकार याबाबत अभ्यास करेल असे म्हटले होते. आता या संसदीय समितीने गोव्याच्या कायद्याचा अभ्यास सुरू केल्याने केंद्र सरकारचा इरादा स्पष्ट झाला आहे.

कच्चा मसुदा बनविण्याचे निर्देश

देशभरातील सर्व नागरिकांना समान नागरी हक्क, अधिकार आणि कर्तव्य असावेत अशी भाजपची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. त्यानुसार सर्व नागरिकांना समान नागरी संहिता असावी असा विचार यापूर्वी केंद्रीय नेत्यांनी अनेकवेळा बोलून दाखवला आहे. यासाठी समान नागरी कायदा आणावा अशी मागणी भाजप नेते करत आहेत. यासाठीच केंद्र सरकारच्या संसदीय समितीने राज्याच्या समान नागरी संहितेचा अभ्यास आणि पुनरावलोकन सुरू केले आहे. केंद्र सरकारनेही कायदा कमिशनला यासंदर्भात कच्चा मसुदा बनविण्याचे निर्देश दिल्याची माहिती आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: गोव्यात लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेले मंत्री, पोलिसांवर राजकीय दबाव; इंडिया आघाडीचा आरोप

Ponda Murder Case: सांताक्रुज, फोंड्यात मामाकडून भाच्याचा खून

Canada PM Justine Trudeau: जस्टिन ट्रुडो यांच्यासमोर 'खलिस्तानी घोषणा'; भारताने कॅनडाच्या राजदूताला बोलावून नोंदवला निषेध

दोन महिन्यात कसे वाढवले 40 हजार फॉलोअर्स, गोव्याच्या इन्फ्लुएन्सरने शेअर केलं सिक्रेट

Sahil Khan Arrested: गोव्यासह पाच राज्यातून दिवस-रात्र प्रवास; बेटिंग घोटाळ्यात अडकलेला साहिल खान अखेर गजाआड

SCROLL FOR NEXT