Atal Setu On Mandovi River
Atal Setu On Mandovi River Dainik Gomantak
गोवा

महत्वाची बातमी! सावंतवाडी, बाणास्तरी येथून पणजीत येणाऱ्या अवजड वाहनांना NH66 महामार्गावर बंदी

Pramod Yadav

मांडवीवरील अटल सेतूवर (Atal Setu On Mandovi River) दुरूस्तीचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे 17 ते 27 या काळात रात्री आणि दिवसा अटल सेतू वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. पण, यामुळे पर्वरी मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. दुरूस्तीसाठी वापरण्यात येणाऱ्या अवजड वाहनांमुळे वाहतूक बंद केली आहे.

पण, यामुळे पणजी आणि पर्वरीत (Panaji And Porvorim) मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असल्याची माहिती पोलिसांनी उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

अटल सेतू बंद असल्यामुळे अवजड वाहने देखील नवीन मांडवी पुलावरून (New Mandovi Bridge) जात आहेत. यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. यामुळे अग्निशमन दल आणि रूग्णवाहिका देखील वाहतूक कोंडीत अडकून पडत आहेत. त्यामुळे अटस सेतूचे काम सुरू असेपर्यंत उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी सावंतवाडी आणि बाणास्तरी (Sawantwadi And Banastarim) वरून पणजीत येणाऱ्या अवजड वाहनांना बंदी घातली आहे.

सकाळी सात ते रात्री आठ वाजेपर्यंत अवजड वाहने आणि मल्टी एक्सेल वाहनांना (Heavy And Multi Axel Vehicles) राष्ट्रीय महामार्ग 66 वर (National Highway 66) बंदी घातली आहे. 27 मार्चपर्यंत हा आदेश लागू राहणार आहे. अवजड वाहनांना बांदा येथे थांबा असेल तर, बाणास्तरी येथून येणारी वाहने बाणास्तरी पुलावरून वळवली जातात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime News: नागाळीत चोरट्यांचा 'सुळसुळाट', दोनापावलातूनही सोन्याचे दागिने लंपास; पोलिसांच्या दुर्लक्षाचा होतोय आरोप

Goa Crime News: पत्‍नीच्‍या खूनप्रकरणी दोषी पतीला कोर्टाने सुनावली जन्‍मठेपेची शिक्षा; 50 हजारांचा दंडही ठोठावला

Laxmikant Parsekar: पार्सेकरांची झाकली मूठ कायम, गूढ वाढले! तानावडे पुन्हा घेणार भेट; पाऊणतासाची बैठक निर्णयाविना

Tivim Crime: पैशांच्या वसुलीसाठी अभियंत्याचे अपहरण; कोलवाळ पोलिसांनी तिघा संशयितांच्या आवळल्या मुसक्या

Lok Sabha Election 2024: भाजपचा प्रचाररथ 'सुसाट'; 3 तारखेला अमित शाह यांची गोव्यात धडाडणार तोफ

SCROLL FOR NEXT