MoU signed between Goa Tourism & Temple Connect Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील मंदिरांची ख्याती जागतिक पातळीवर पोहचणार; अध्यात्मिक, सांस्कृतिक पर्यटनवाढीसाठी सरकारचा मोठा निर्णय

टेंपल कनेक्ट राज्यातील मंदिरांना जागतिक पातळीवर जोडून पर्यटन क्षमता वाढवण्यास मदत करेल.

Pramod Yadav

MoU signed between Goa Tourism & Temple Connect: गोव्याच्या अध्यात्मिक आणि सांस्कृतिक पर्यटनवाढीसाठी सरकारचा मोठा निर्णय घेतला आहे. गोवा सरकारने बुधवारी टेंपल कनेक्ट या मंदिराच्या पुनरुज्जीवन आणि विकासासाठी समर्पित संस्थेसोबत सामंजस्य करार (MoU) केला आहे.

टेंपल कनेक्ट राज्यातील मंदिरांना जागतिक पातळीवर जोडून पर्यटन क्षमता वाढवण्यास मदत करेल. तसेच, यामुळे गोव्याच्या अध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारशाची जगभरात ओळख होईल. असे पर्यटन मंत्री रोहन खंवटे म्हणाले.

सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, राज्याचे पर्यटन मंत्री रोहन खंवटे, टेम्पल कनेक्टचे सीईओ गिरीश कुलकर्णी व इतर मान्यवर उपस्थित होते.

हा सामंजस्य कराराचा हेतू गोवा आणि टेंपल कनेक्ट यांच्यात संभाव्य व्यावसायिक संधी शोधण्यासाठी आहे. राज्यातील ज्या मंदिरांना संरक्षण आणि जीर्णोद्धाराची गरज आहे, त्यांना शोधून त्यांची योग्य देखभाल आणि जीर्णोद्धार केला जाईल. यासाठी संयुक्तपणे उपक्रम राबवला जाणार असून, सुरूवातीला प्रायोगिक तत्त्वावर पाच मंदिरांमध्ये हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. अशी माहिती समोर आली आहे.

सामंजस्य करारामुळे गोव्यातील मंदिरांचा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा दाखविण्यासाठी विविध मार्केटिंग चॅनेल आणि प्लॅटफॉर्मचा वापर केला जाईल. त्यामाध्यमातून पर्यटकांना आकर्षित करून आणि पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी गोवा सरकारच्या मदतीने प्रयत्न केले जातील.

कराराअंतर्गत मंदिरातील पुजारी, मार्गदर्शक आणि इतर संबंधित कर्मचार्‍यांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आणि कार्यशाळा घेणे तसेच, आदरातिथ्य, संवाद कौशल्ये आणि वारसा संवर्धनावर लक्ष केंद्रित करण्यासाठी देखील चर्चा केली जाणार आहे. अशी माहिती समोर आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kulem: 1967 पासून मूर्ती बनवण्याचे काम, वडिलांना पॅरॅलिसिसचा अटॅक; तरी 3 बहिणींनी जपली 'गणेशमूर्ती' बनवण्याची परंपरा

Damodar Saptah: ..पंढरीच्‍या वारकऱ्यांसाठी जशी विठूमाउली, तसा गोव्यातील भाविकांसाठी दामबाब! आख्‍यायिकांनी भरलेला 'देव दामोदर'

Morjim Beach: 'मोरजी किनाऱ्यावरील सुशोभीकरण थांबवा'! गोवा खंडपीठाचा आदेश; GTDC प्रकल्पाला खीळ

Career and Money Horoscope: करिअरमध्ये यश, पैशांत वाढ! वाचा दैनिक भविष्य; जाणून घ्या ग्रहांचे संकेत

Cutbona Jetty: 'माशे मेंळ्ळे ना'! समुद्र अजून खवळलेला, कुटबण जेटीवर मजूर परतले; ट्रॉलरमालकांची वाढली लगबग

SCROLL FOR NEXT