Goa Viral Video Dainik Gomantak
गोवा

Viral Video: 'बिकिनी घातलेल्या फॉरेनरसाठी आणलीय साडी'; सासु - सुनेचा गोव्यातला धम्माल व्हिडिओ

Goa Viral Video: रेश्मा आणि तिची सासू गोव्यातील बीचवर फिरतायेत त्यावेळी तिच्या सासूची नजर बीचवर असलेल्या बिकिनीतील एका फॉरेनर पर्यटक महिलेवर पडली.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: जगभरातील पर्यटकांच्या पसंतीचे ठिकाण असलेल्या गोव्याला जाण्याची अनेकांची इच्छा असते. येथील समुद्रकिनारे, ऐतिहासिक वास्तू, सी- फूड आणि नाईट लाईफ याची भुरळ न पडलेला व्यक्ती विरळाच. महाराष्ट्रातील अशाच सासु -सुनेला देखील गोव्याची भुरळ पडली आणि दोघींनी थेट गोव्याचा समुद्रकिनारा गाठला. समुद्रकिनाऱ्यावर सासु - सुनेचा झालेला संवाद सध्या इन्स्टाग्रामवर चांगलाच व्हायरल होत आहे.

रेश्मा राठोड या Instagram Influencer ने सासुसोबतचा गोव्यातील एक व्हिडिओ शेअर केला आहे. रेश्मा सासूसोबत गोव्यात गेली असता झालेली गंमत तिने रील स्वरुपात शेअर केली आहे.

रेश्मा आणि तिची सासू गोव्यातील बीचवर फिरतायेत त्यावेळी तिच्या सासूची नजर बीचवर असलेल्या बिकिनीतील एका फॉरेनर पर्यटक महिलेवर पडली. सासुबाईला त्या पर्यटक महिलेच्या कपड्यांवर आक्षेप घेतला आणि सोबत आणलेल्या ५-६ साड्या तिला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली. सूनबाई मात्र त्या साड्या घालणार नाहीत, असे म्हणत सासुबाईला तेथून घेऊन जातात.

रेश्मा राठोड यांच्या या रिलला दीड कोटीपेक्षा अधिक Views मिळाल्या आहेत, तर अडीच लाख लोकांनी या रिलला लाईक केले आहे. सुमारे अडीच हजार नेटकऱ्यांनी या रिलवर कमेंट केली आहे. अनेकांनी सासू - सुनेच्या या जोडीचे अनेकांनी कौतुक केले आहे.

सासू - सुनेच्या या जोडीने गोव्याच्या बीचवरुन आणखी एक व्हिडिओ शेअऱ केला असून, दोघी हिंदी गाण्यावर थीरकताना दिसत आहेत. या व्हिडिओला देखील २३ हजारांपेक्षा अधिक लाईक्स मिळाल्या असून, मोठ्या प्रमाणावर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT