Scooter Accident Dainik Gomantak
गोवा

Ponda: म्हार्दोळ येथे रस्त्यावर अचानक भटकी कुत्री आल्यानं दुचाकीचा अपघात, माय-लेक जखमी

Mhardol Scooter Accident: फोंडा तालुक्यातील म्हार्दोळ परिसरात शुक्रवारी सकाळी एक दुचाकी अपघातात आई व तिची मुलगी गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आलीय.

Sameer Amunekar

पणजी: फोंडा तालुक्यातील म्हार्दोळ परिसरात शनिवारी (7 जून) सकाळी एक दुचाकी अपघातात आई व तिची मुलगी गंभीर जखमी झाल्या. बगल रस्त्यावरून जात असताना अचानक समोर आलेल्या भटक्या कुत्र्यांमुळे स्कुटरवरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाला.

या अपघातात दोघींनाही दुखापत झाली असून त्यांना तातडीनं फोंडा उपजिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.ही घटना शनिवारी (7 जून) दुपारच्या सुमारास घडली.

या अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत करत दोघींना रुग्णालयात हलवले. प्राथमिक माहितीनुसार, भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट हा प्रकार वाढत असून त्यामुळे अपघातांची शक्यता अधिक वाढली आहे.

राज्यातील अनेक परिसरात भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या लक्षात घेता तातडीने योग्य उपाययोजना कराव्यात, अन्यथा भविष्यात आणखी गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे.

या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. राज्यातील शहरात दिवसेंदिवस भटक्या कुत्र्यांची समस्या वाढत असून, अशा घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची मागणी होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Punjab Flood: पूरग्रस्त भागाची पाहणी करताना पंजाब मंत्र्यांच्या 'गोवा' ट्रीपबाबत गप्पा; व्हिडिओ व्हायरल, विरोधकांची टीका

हत्तीने प्रलंयकारी होऊन नासधूस करू नये, म्हणून गजमुखी देवतेची पूजा प्रचलित झाली असावी; गणपतीपूजनाची गोमंतकीय प्रथा

Goa Live Updates: विजय सरदेसाई यांनी दारू तस्करीच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले

Ganesh Chaturthi: ऑर्केस्ट्रा, जादूचे प्रयोग, लॉटरी यांचे स्थान 'गणेशोत्सव' होऊच शकत नाही

SOPO Tax: दक्षिण गोव्यातील 'सोपो' प्रकरणात घोटाळ्याची शक्यता! निविदा जारी करण्यास विलंब; SGPDAचे आर्थिक नुकसान

SCROLL FOR NEXT