Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: आईकडून 10 वर्षीय मुलाला स्टीलच्या रॉडने मारहाण, मुलाने दाखल केली पोलिस तक्रार

Goa Crime News: मुलाने पोलिसांत धाव घेत याप्रकरणी पोलिस तक्रार दाखल केली आहे. पोलिस अधिक तपास करतायेत.

Pramod Yadav

डिचोली: शुल्लक काराणावरुन वडिलांनी सहा वर्षीय मुलीचा खून केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आल्यानंतर आता आईने १० वर्षीय मुलाला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. घरगुती वादातून डिचोलीत हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती समोर येतेय. मुलाने याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डिचोलीत दहा वर्षीय मुलाला आईने स्टीलच्या रॉडने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात मुलाला किरकोळ जखम झाली आहे. घरगुती वादातून ही घटना घडल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. मुलाची बांबोळी येथील आरोग्य केंद्रात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. दरम्यान, मुलाने पोलिसांत धाव घेत याप्रकरणी पोलिस तक्रार दाखल केली आहे. पोलिस अधिक तपास करतायेत.

वडिलांनी सहा वर्षीय मुलीचा केला खून

किरकोळ कारणावरुन वडिलांनी सहा वर्षीय मुलीचा खून केल्याची घटना मंगळवारी (२९ एप्रिल) उघडकीस आली. मुलीने आईकडे कोणत्यातरी गोष्टीसाठी हट्ट धरला होता. दरम्यान, यावरुन संतापलेल्या वडिलांनी दारुच्या नशेत मुलीला दांडकाने मारहाण केली. यातच मुलीचा मृत्यू झाला. संशयित सध्या फरार असून, पोलिस तपास करतायेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT