Criminal Arrested in Panjim Dainik Gomantak
गोवा

‘मोस्ट वॉन्टेड’ गुंड विक्कीच्या गोवा पोलिसांनी मुसक्या आवळल्या

अधिक चौकशीसाठी विक्रांत देशमुखला 4 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी : खून, दरोडे, खंडणीसारख्या 33 गुन्ह्यांमध्ये नवी मुंबई पोलिसांना हुलकावणी देणारा ‘मोस्ट वॉन्टेड’ गुंड विक्रांत देशमुख ऊर्फ विकी याला रविवारी पहाटे २ च्या सुमारास पणजीत कॅसिनोजवळ फिल्मी स्टाईने पकडण्यात आले. पणजी पोलिस व मुंबई पोलिसांनी ही संयुक्तरित्या कारवाई केली. तो पोलिसांना खून आणि ‘मोक्का’ या गुन्ह्यांमध्ये हवा आहे.

त्याच्याविरुद्ध पणजी पोलिसांनी बेकायदेशीरपणे शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी शस्त्रास्त्र प्रतिबंधक कायद्याच्या कलम 3 च्या 25 नुसार गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याप्रकरणी अधिक चौकशीसाठी त्याला 4 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

विक्कीचा गोव्यात येण्यामागाचा उद्देश कॅसिनोत जुगार खेळण्याचा की कोणाची सुपारी घेतली होती या बाजुने पोलिस चौकशी सुरू आहे. त्याच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्तुल (कट्टा), 5 जिवंत काडतुसे, मोबाईल व काही बँकेची एटीएम कार्डस् जप्त करण्यात आली आहेत. त्याचा आणखी एक साथीदार गोव्यात आला होता. त्याचा शोध घेण्यात येत आहे.

क्राईम ब्रँचकडे सोपवणार

फोर्च्युनर गाडीने विक्की मुंबईतून कळंगूट येथे उतरला होता. तपास पूर्ण झाल्यावर त्याला नवी मुंबईच्या क्राईम ब्रँचकडे त्यांच्या गुन्ह्यांच्या तपासासाठी सुपूर्द केले जाईल अशी माहिती उत्तर गोवा पोलिस निरीक्षक शोबित सक्सेना यांनी दिली.

गोवा हे पर्यटन स्थळ असल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देतात. त्यामुळे गेल्या दोन दशकांपासून गंभीर गुन्हे केलेल्या कुविख्यात गुन्हेगारांनी गोवा हे लपण्याचे आश्रयस्थान बनविले आहे. काही दिवसांपूर्वी डॉलर्सच्या चोरीप्रकरणी फरारी असलेल्या महिलेला कॅसिनोमध्ये अटक झाली होती. गुन्हेगार गंभीर गुन्हे करून गोव्यात आश्रय घेतात. काही घरमालक पैशाच्या हव्यासापोटी भाडेकरूची माहिती पोलिसांना देत नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

उन्हाचा चटका आणि महागाईचा फटका! घामाच्या धारांनी नागरिक हैराण; मागणी वाढल्याने भाजीपाला-फळं महागली

Goa Taxi Issue: दक्षिण गोव्यात स्थानिक टॅक्सीचालक आक्रमक, ऑनलाईन टॅक्सीसेवेला तीव्र विरोध; पोलिसांकडून कारवाईचे आश्वासन

Ponda By-Election: फोंड्यात आता भाजपविरुद्ध भाटीकर? भाजपची संपूर्ण प्रचार यंत्रणा रिंगणात; काँग्रेसचे सावध डावपेच

Shirgaon Jatra: शिरगाव जत्रेपूर्वी धोकादायक कुंपण हटवले, भाविकांची सुरक्षा लक्षात घेऊन प्रशासनाने दिले होते निर्देश

Egg price: ब्रॉयलर अंडी झाली स्वस्त; 70 रु. डझन, आवक वाढली; डझनमागे 20 रुपयांनी घट

SCROLL FOR NEXT