Goa Mining: Dainik Gomantak
गोवा

Goa Mining: जनसुनावणीत अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद नाही; पंचायत, बहुतांश नागरिक खाणीच्या समर्थनार्थ...

Goa Mining: प्रशासकीय यंत्रणा सज्ज : दाखला मिळविण्यासाठी धडपड

Shreya Dewalkar

Goa Mining: शिरगाव खाण ब्लॉकअंतर्गतच्या शिरगाव खाणीचे भवितव्य जनसुनावणी नंतर स्पष्ट होणार आहे. या खाणीला पर्यावरणीय दाखला मिळविण्यासाठी आज जनसुनावणीला सुरूवात झाली असून अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद मिळत नसल्याचे समोर येते. स्थानिक पंचायतीसह बहुतांश नागरिक खाणीच्या समर्थनार्थ आहेत.

वाठादेव-डिचोली येथील नारायण झांट्ये महाविद्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात ही जनसुनावणी निश्चित करण्यात आली आहे. उत्तर गोवा जिल्हाधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आदी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जनसुनावणीला सुरूवात झाली असून सुरक्षा यंत्रणाही कडक आहे.

शिरगाव खाण ब्लॉक 95.6712 हेक्टर क्षेत्रफळात व्यापलेला आहे. प्रतिवर्ष 0.5 मिलियन टन खनिज उत्पादन करण्यासाठी शिरगाव येथील खाणीला पर्यावरणीय दाखला आवश्यक आहे. त्यासाठी ही जनसुनावणी पार पडत आहे.

खाण लीज क्षेत्र आदी काही मुद्दे अलीकडेच ऐरणीवर आले असले तरी शिरगावमधील बहुतांश नागरिकांना खाण व्यवसाय सुरू झालेला हवा आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरून खाणीला मोठासा विरोध होत नाही आहे.

खाणीच्या समर्थनार्थ शिरगाववासीयांनी सह्यांची मोहीम राबवली असून, त्‍यास चांगला प्रतिसाद मिळाला असल्‍याची माहिती मिळाली आहे. तरीसुद्धा पर्यावरणप्रेमी आणि खाणविरोधक काही मुद्यांवरून आक्रमक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पर्यावरण आघात मूल्यांकन (ईआयए) अहवालाच्या सादरीकरणानंतरच शिरगाव खाणीचे भवितव्य स्पष्ट होणार आहे.

मोठा पोलिस फौजफाटा तैनात

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात नारायण झांट्ये महाविद्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहातच डिचोली खाण ब्लॉक अंतर्गतच्या खाणीसाठी जनसुनावणी घेण्यात आली होती. त्यावेळी प्रचंड गर्दी उसळली होती. म्हणूनच आजच्या जनसुनावणी दरम्यान, सुरक्षा यंत्रणा सज्ज झाली आहे. जनसुनावणीस्थळी मोठ्या पोलिस फौजफाट्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT