fire due to mosquito coil Dainik Gomantak
गोवा

Mosquito Coil Accident: डासांसाठी कॉईल लावली, घराला लागली आग; फोंड्यात 2 लाख रुपयांचे सामान क्षणात खाक

Mosquito coil fire accident Ponda: आगीत सुमारे २ लाख रुपयांचे नुकसान झाले असले तरी, अग्निशमन दलाच्या तात्काळ आणि जलद कारवाईमुळे घरातील उर्वरित भाग वाचवण्यात यश

Akshata Chhatre

फोंडा: फोंडा येथील शांतीनगरमध्ये रविवारी (दि.०१) रात्री एक धक्कादायक घटना घडली. एका घराला डासांच्या कॉईलमुळे आग लागल्याचा अंदाज आहे. या आगीत सुमारे २ लाख रुपयांचे नुकसान झाले असले तरी, अग्निशमन दलाच्या तात्काळ आणि जलद कारवाईमुळे घरातील उर्वरित भाग वाचवण्यात यश आले, त्यामुळे मोठे नुकसान टळले.

डासांची कॉईल ठरली आगीचे कारण?

मिळालेल्या माहितीनुसार, शांतीनगरमधील एका घरात डास घालवण्यासाठी कॉईलपेटवून ठेवली होती. रात्रीच्या वेळी ही कॉईल पडल्यामुळे घरातील वस्तूंनी पेट घेतला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले आणि घरात धुराचे साम्राज्य पसरले.

या घटनेची माहिती मिळताच, फोंडा अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कोणतीही वेळ न घालवता आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

त्यांच्या अथक परिश्रमामुळे आगीवर लवकरच नियंत्रण मिळवण्यात यश आले आणि घरातील उर्वरित भागाला आग लागण्यापासून वाचवता आले.

अग्निशमन दलाचे कौतुक

या आगीत घरात सुमारे २ लाख रुपयांचे नुकसान झाले असले तरी, अग्निशमन दलाच्या जवानांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे आणि शौर्यामुळे मोठी हानी टळली. त्यांच्या या कामगिरीचे स्थानिकांनी कौतुक केले आहे. रहिवाशांनी डासांची कॉईल, मेणबत्त्या किंवा इतर ज्वलनशील वस्तू वापरताना योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन यानिमित्ताने करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Amit Shah In Goa: "2047 पर्यंत वाट पाहायची गरज नाही, 2037 पर्यंत गोवा 'विकसित राज्य' बनेल", गृहमंत्री अमित शहांचा विश्वास

अमित शहांच्या हस्ते 'म्हजे घर योजने'चा भव्य शुभारंभ! CM सावंतांनी दिली '6 महिन्यांत नोंदणी'ची ग्वाही

ओपा प्रकल्पातील दुरुस्ती पूर्णत्वाकडे; पणजीला 11 वाजेपर्यंत पाणीपुरवठा सुरु होण्याची शक्यता!

Viral Post: भारत माझ्यासाठी मंदिरासमान! माझ्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकला, पाकिस्तानी क्रिकेटरने ट्रोलर्सला पहिल्यांदाच दिलं उत्तर! पोस्ट चर्चेत

Goa Crime: फेरीबोटीतील कर्मचाऱ्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला; मुख्य संशयितासह दोघांना अटक

SCROLL FOR NEXT