Morpirla Parents Protest  Gomantak Digital Team
गोवा

Morpirla Parents Protest : शाळेत मुलांच्या जीवाला धोका; ज्ञानार्जनासाठी पाठविणार नाही! पालकांचा संताप

मोरपिर्लातील विद्यालयाची इमारत तत्काळ दुरूस्त करा

गोमन्तक डिजिटल टीम

Morpirla Parents Protest : सतत आठ वर्षे दहावीचा शंभर टक्के निकाल देणाऱ्या मोरपिर्ला केपे येथील सरकारी विद्यालय व प्राथमिक शाळेची अवस्था बिकट झाली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या विद्यालयाची दुरुस्ती करण्याच्या मागणीकडे विद्यालाय प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्याने पालकांनी संताप व्यक्त केला आहे. त्यामुळे पालकांनी उद्यापासून आपल्या पाल्यांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.

मोरपिर्ला गावातील सरकारी प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या इमारतीची परिस्थिती अत्यंत बिकट झाल्याने शाळेवर बहिष्कार घालण्याचा निश्‍चय पालकांनी केल्याचे पंच सदस्य प्रकाश वेळीप यांनी सांगितले. रोहिदास गावकर म्हणाले, की मुख्यमंत्री केपे येथे आल्यावर शाळेची दुरवस्था त्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यांनी अधिकाऱ्यांना निर्देशही दिले होते. केपे येथील साहाय्यक शिक्षण संचालक कार्यालयात जाऊन त्यांना सुद्धा याची जाणीव करून दिली होती, पणपुढे त्याचे काय झाले, याबाबत कोणीही उत्तर देत नाही.

सरकारला भावनिक आवाहन

मोरपिर्ला गाव केपे मतदारसंघातील ग्रामीण भागात येते. या विद्यालयात शिकणारी मुले गरीब कुटुंबातील आहे. त्यांना शहरात जाऊन शिक्षण घेता येत नाही. त्यांच्या पालकांना आर्थिकदृष्ट्या ते परवडत नाही. याच विद्यालयावर गाव आणि परिसरातील मुलांचे भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे सरकार आणि प्रशासनाने त्यांच्या जीविताशी खेळू नये, असे भावनिक आवाहन पालकांनी केले आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिलेले शाळा दुरुस्तीचे आश्‍वासन हवेतच विरले आहे. शाळेची सध्याची दुरवस्था पाहता कधीही छप्पर कोसळून विद्यार्थ्यांवर पडू शकते. अशा परिस्थितीत पालक आपल्या मुलांना शाळेत कसे पाठवणार? संबंधित खात्यांच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी सांगूनसुद्धा त्यांनी या गंभीर गोष्टीकडे दुर्लक्ष केले. आपल्या पाल्यांच्या सुरक्षेसाठीच पालकांनी मुलांना शाळेत न पाठिवण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रकाश वेळीप, पंच सदस्य

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT