FC Goa  Dainik Gomantak
गोवा

मोरोक्कन खेळाडू एफसी गोवा संघात

दैनिक गोमन्तक

पणजी: मोरोक्कन विंगर नोह सादौई याच्याशी एफसी गोवाने दोन वर्षांचा करार केला आहे. आगामी इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत तो संघातील प्रमुख खेळाडू असेल.

सादौई मोरोक्कोचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू आहे. दोन वर्षांपूर्वीआफ्रिका नेशन्स स्पर्धा जिंकलेल्या मोरोक्कोच्या संघात त्याचा समावेश होता. 2022-23 मोसमासाठी एफसी गोवाने करारबद्ध केलेला 28 वर्षीय नोह हा चौथा परदेशी फुटबॉलपटू ठरला. यापूर्वी त्यांनी अल्वारो वाझकेझ, फारेस अरनौट, इकेर ग्वार्रोचेना या परदेशी खेळाडूंशी करार केला आहे. (Moroccan winger Noah Sadaoui has signed a two-year contract with FC Goa )

दोन वर्षांपासून संघाच्या संपर्कात

``एफसी गोवासमवेत कारकिर्दीतील नव्या टप्प्यास सुरवात करताना आनंद होत आहे. माझ्यासाठी हा क्लब नवखा नाही. मागील दोन वर्षांपासून या क्लबच्या संपर्कात होतो. या कालावधीत मला या क्लबला समजून घेता आले, असे सादौई याने एफसी गोवाच्या करारपत्रावर सही केल्यानंतर सांगितले.

जिंकणे हेच मुख्य उद्देश

सामने आणि करंडक जिंकणे हाच या संघाशी करार करण्यामागचा मुख्य उद्देश आहे, असे त्याने नमूद केले. इतर देशातील क्लबकडूनही ऑफर्स होत्या, पण एफसी गोवाचे मुख्य प्रशिक्षक कार्लोस पेनया यांनी माझ्या क्षमतेवर पूर्ण विश्वास प्रदर्शित केला. त्यामुळे या संघात रुजू होण्याचा आत्मविश्वास प्राप्त झाला,असे तो म्हणाला.

अप्रत्याशित क्षमतेचा खेळाडू

``व्यापक शोधमोहिमेनंतर आम्हाला नोअ गवसला आहे. मागील काही वर्षे आम्ही त्याच्यासाठी इच्छुक होतो. या वर्षी संधी प्राप्त झाली आणि तो आमच्या संघात दाखल होईल याची खबरदारी घेतली,`` असे एफसी गोवाचे फुटबॉल संचालक रवी पुस्कुर यांनी सांगितले. ``नोह अप्रत्याशित क्षमतेचा खेळाडू आहे आणि आघाडी फळीत कोठेही खेळू शकतो. सहजपणे जागा शोधून गोल साधण्याची त्याची शैली नैसर्गिक आहे,`` असेही संघातील नव्या खेळाडूच्या गुणवत्तेविषयी पुस्कुर म्हणाले.

विविध देशांत खेळलेला फुटबॉलपटू

- 2020 आफ्रिकन नेशन्स स्पर्धेतील उपांत्य व अंतिम फेरीसह मोरोक्कोतर्फे ४ आंतरराष्ट्रीय सामने

- युवा पातळीवर मोरोक्कोतील वायदाद कासाब्लांका क्लबमध्ये जडणघडण

- वयाच्या 11व्या वर्षी अमेरिकेत स्थलांतरित, तेथील मेजर लीग संघ न्यूयॉर्क रेड बुल्स अकादमीत दाखल

- नंतर इस्त्राईलमधील प्रीमियर लीग संघ मक्काबी हैफा, द्वितीय विभागीय संघ हापोएल क्फार साबा, हापोएल नाझारेथ इलिट या संघांचे प्रतिनिधित्व

- दक्षिण आफ्रिकेतील अयॅक्स केप टाऊन (आताचा केप टाऊन स्पर्स) संघातर्फे 201५ मध्ये एमटीएन 8 स्पर्धा विजेता

- 201६ मध्ये अमेरिकेतील मायामी युनायटेडतर्फे नॅशनल प्रीमियर सॉकर लीग विजेतेपद

- रियाल सीडी एस्पाना (होंडुरास), अल-काबुरा व मिरबात स्पोर्टस क्लब (दोन्ही ओमान), एनप्पी स्पोर्टस क्लब (इजिप्त), एमसी औदा, राजा कासाब्लांका, एएस एफएआर रबात (मोरोक्को) या संघांचेही प्रतिनिधित्व

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT