Vasco  Dainik Gomantak
गोवा

Vasco News : मुरगावात मान्सूनपूर्व कामे रखडली; पालिकेला मुहूर्त मिळेना

गोमन्तक डिजिटल टीम

Vasco News :

वास्को, लोकसभा निवडणुकीचे मतदान झाले असून मुरगाव पालिकेच्या मान्सूनपूर्व कामांना आता कधी सुरवात होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. मुरगाव पालिकेची मान्सूनपूर्व कामे अद्याप सुरू न झाल्याने नाले, गटारांतील पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी संबंधितांना धावपळ करावी लागणार आहे.

वास्को-मायमोळे तळ्यातील गाळ उपसा करण्याचे काम यंदा पावसाळ्यापूर्वी हाती घेण्यात आल्याने पाण्याचा निचरा होण्यास मोठी मदत होणार आहे. मात्र, मध्यंतरी हे काम बंद ठेवण्यात आले. ते अद्यापही बंदच आहे. येथील बायणा, मांगोरहिल तसेच निरनिराळ्या भागांतील नाले, गटारांतील पाणी वाहत मायमोळे तळ्यात जमा होते. त्यामुळे सध्या तरी तळ्याला मोठ्या डबक्याचे रूप प्राप्त झाले आहे.

पावसाळ्यात या तळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी जमा होते. तळ्यात गाळ जमा झाल्याने तसेच पाणवनस्पतींमुळे पाण्याचा निचरा होण्यास अडथळा होतो. या समस्या लक्षात घेऊन वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांनी मायमोळे तळ्यातील गाळउपसा करण्याचे काम हाती घेतले होते.

मायमोळे तसेच धाकतळे या दोन्ही तळ्यातील गाळ उपसा करण्याचे काम बऱ्याच प्रमाणाप्त झाले आहे. या तळ्यातील पाणी गोवा शिपयार्डलगतच्या नाल्यातून वाहत जाते. तेथून ते समुद्राच्या पाण्यात मिसळते.

मात्र, दुसरीकडे मुरगाव पालिकेकडून मान्सूनपूर्व कामांना अद्याप सुरवात झालेली नाही. गेल्या महिन्यात अवकाळी पाऊस पडल्यावर काही ठिकाणी गटारे, नाले तुंबण्याचे प्रकार घडले होते. त्यावेळी काही नगरसेवकांना गटारांतील घाण काढण्यासाठी मजुरांवर पैसा खर्च करावा लागला होता. आता मतदानानंतर येथील गटारे, नाले सफाईसंबंधी हालचाली होतील. गतवर्षीही असाच प्रकार घडला होता; परंतु त्यावेळी एका कंत्राटदाराकडून कामे करून घेण्यात आली होती.

नाल्यात मातीचा ढिगारा

मुरगाव पालिकेतर्फे मान्सूनपूर्व कामांना सुरवात न केल्याने वास्को, बायणा, वाडे भागात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. वास्कोतील बेलाबाय, भुटेभाट व ओरूले परिसरात कामे हाती घेणे आवश्यक आहे.

कारण दक्षिण-पश्चिम रेल्वे प्राधिकरणाने भुटेभाट-मेस्तावाडा-बेलाबाय येथील मुख्य नाल्यात मातीचा ढिगारा टाकल्याने येथे पूरग्रस्त स्थिती निर्माण होऊ शकते.

गाळउपशास विलंब

दाबोळी-मेर्सीस वाडे-चाफेरान परिसरातील मुख्य नाल्यातील गाळ उपसण्याचे काम मुरगाव पालिकेने हाती घेणे आवश्यक आहे. दरवर्षी एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात येथील गाळ काढण्याचे काम सुरू होत असे; परंतु यंदा मे महिना सुरू झाला तरी येथील नाल्यातील गाळ उपासण्याचे काम सुरू न झाल्याने स्थानिक रहिवाशांनी चिंता व्यक्त केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ponda: बहिणीने धाडस केले पण भाऊ बचावला नाही; 17 तासानंतर आढळला दर्शन नार्वेकरचा मृतदेह

मेरशीत एक महिन्यापासून उभ्या जीपमध्ये आढळला मृतदेह, परिसरात खळबळ; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Belgaum Highway: गोवा-बेळगाव महामार्गावरील वाहतूक ठप्प, दोन्ही बाजूला 4-5 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा

Divar Island: पाचव्या शतकातील निर्मिती प्रक्रिया वापरुन गोव्यात उभारलं जातंय जहाज; पुढल्या वर्षी करणार गुजरात ते मस्कत प्रवास

Funny Viral Video: 3 वर्षापासून पैसे साठवून 4 मित्र गोव्याला निघाले, टोल भरण्यातच खिसे रिकामे झाले

SCROLL FOR NEXT