Minor girl Assault: नराधम बस चालकाचे घृणास्पद कृत्य! 6 वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; आरोपी बक्षीला 4 दिवसांची पोलीस कोठडी

Porvorim Minor girl Assault: शाळेच्या बस चालकानेच एका ६ वर्षांच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता.
Porvorim Minor girl Assault
Porvorim Minor girl AssaultDainik Gomantak
Published on
Updated on

पर्वरी: गोव्यातील पर्वरी परिसरात एका संतापजनक घटनेने खळबळ उडालीय. शाळेच्या बस चालकानेच एका ६ वर्षांच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी पर्वरी पोलिसांनी कारवाई करत संशयित आरोपी अल्लाबक्ष सय्यदाबादे ऊर्फ बक्षी याला बेड्या ठोकल्या आहेत.

या घटनेची माहिती तेव्हा समोर आली जेव्हा पीडित मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात धाव घेतली. आपल्या ६ वर्षांच्या मुलीसोबत शाळेच्या बस चालकाने गैरवर्तन केल्याचे आईच्या लक्षात आले. तक्रारीनुसार, संशयित आरोपी अल्लाबक्ष याने पीडितेच्या गुप्तांगांना स्पर्श करून तिचा लैंगिक छळ केला आणि तिच्यावर बलात्कार केला.

चार दिवसांची पोलीस कोठडी

अटक करण्यात आलेल्या अल्लाबक्ष सैय्यदबादे याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस आता या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, यापूर्वीही या चालकाने अशा प्रकारचे कृत्य केले आहे का, याची चाचपणी केली जात आहे. शाळेच्या बसमध्येच अशा प्रकारची घटना घडल्याने शालेय प्रशासनाच्या सुरक्षिततेवरही मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

घर खाली करण्याची नोटीस

लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेला अल्लाबक्ष सय्यदाबादे ऊर्फ बक्षी (४६) याच्‍या घरावर मंगळवारी (२३ डिसेंबर) स्थानिक पंचायतीने नोटीस चिकटवली आहे. या नोटिशीनुसार, बक्षी कुटुंबाला सात दिवसांत घर खाली करावे लागणार आहे. दरम्‍यान, तत्‍पूर्वीच संशयिताच्‍या पत्‍नीने आपल्‍या १६ वर्षीय मुलीला घेऊन नातेवाईकांचे घर गाठले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com