Mormugao Port Dainik Gomantak
गोवा

Mormugao Port: मुरगाव बंदरातील कंटेनर वाहतूक ठप्प; नियमित फीडर सेवा बंद पडल्याने उद्योगांना फटका

Mormugao Port Container Transport: नियमित फीडर सेवा बंद पडल्याने मुरगाव बंदरातील कंटेनर वाहतूक संकटात सापडली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: नियमित फीडर सेवा बंद पडल्याने मुरगाव बंदरातील कंटेनर वाहतूक संकटात सापडली आहे. पायाभूत सुविधांतील त्रुटी, मोबाईल क्रेनमध्‍ये वारंवार बिघाड आणि प्रक्रियात्मक विलंबामुळेही वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

सेवा नसल्याने गोव्यातील औषधनिर्मिती, अभियांत्रिकी व उत्पादन क्षेत्रातील उद्योगांना माल रस्तेमार्गे मुंबईतील जेएनपीटीकडे पाठवावा लागत आहे. त्यामुळे वाहतूक खर्च, वेळ आणि महामार्गावरील कोंडी वाढली आहे.

कंटेनर वाहतूक सुरळीत करण्यासाठी गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीने (जीसीसीआय) व्हीजीएफ योजना सुरू करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात राज्य सरकारने मुरगाव बंदर प्राधिकरणाला पत्र पाठवले आहे. पुरेसा माल नसल्याने जहाज कंपन्या सेवा सुरू करत नाहीत आणि सेवा नसल्याने माल समुद्रमार्गे येत नाही, अशा कोंडीत बंदर सापडले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT