Mormugao Municipality Waste Segregation Training Dainik Gomantak
गोवा

Mormugao Municipality Waste Segregation Training: मुरगाव पालिका क्षेत्रातील शाळांमध्ये कचरा वर्गीकरणाचे चार टप्पे; प्रशिक्षण कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद

Waste Segregation Training For Students: मुरगाव पालिकेने या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी प्रत्येक शाळेतून पाच विद्यार्थी आणि दोन शिक्षकांना निमंत्रित केले होते.

दैनिक गोमन्तक डिजिटल

वास्को: मुरगाव पालिकेने पालिका क्षेत्रातील शाळांमधील विद्यार्थी व शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या कचरा वर्गीकरणाच्या चार पद्धतींच्या प्रशिक्षण कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. या प्रशिक्षणात सहभागी झालेले विद्यार्थी व शिक्षक आता आपल्या शाळेतील इतर विद्यार्थ्यांना व शिक्षकांना प्रशिक्षण देणार आहेत.

मुरगाव पालिकेने या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी प्रत्येक शाळेतून पाच विद्यार्थी आणि दोन शिक्षकांना निमंत्रित केले होते. ओल्या व जैवविघटनशील कचऱ्यासाठी हिरव्या कचरापेटीचा वापर करावा. यामध्ये उरलेले अन्नपदार्थ, भाज्या, फळांच्या साली, चहापत्ती तसेच बागेतील कचऱ्याचा समावेश होतो. या कचऱ्यावर कंपोस्ट खताची प्रक्रिया केली जाते. सुका कचरा टाकण्यासाठी निळ्या कचरापेटीचा वापर करावा.

दरम्यान, या प्रशिक्षित विद्यार्थी व शिक्षकांनी आपल्या शाळेतील इतर विद्यार्थी आणि शिक्षकांसाठीही प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करावा. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यासंबंधीचे व्हिडिओ आणि छायाचित्रे शाळेच्या नावासह पाठवावीत, जेणेकरून ती मंत्रालयाच्या पोर्टलवर तसेच इन्स्टाग्राम आणि एक्स (पूर्वीचे ट्विटर) या समाजमाध्यमांवर अपलोड करता येतील, असे पालिका मुख्याधिकारी सिद्धीविनायक नाईक यांनी परिपत्रकात म्‍हटले आहे.

उत्तम सादरीकरण

विद्यार्थ्यांना विविध कचरापेट्यांविषयी माहिती देण्यासाठी पॉवरपॉइंट सादरीकरणाचा वापर करण्यात आला. यावेळी विद्यार्थी व शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देण्यात आली. कचऱ्याचे वर्गीकरण केल्यामुळे कचरा उचलणे सुलभ होते तसेच तो योग्य ठिकाणी त्वरित पाठविण्यास मदत होते, अशी माहिती देण्यात आली.

लाल, काळी कचरापेटी

लाल कचरापेटीचा वापर अस्वच्छ कचऱ्यासाठी केला जातो. त्यामध्ये वापरलेले डायपर, सॅनिटरी पॅड, टॅम्पॉन तसेच इतर तत्सम वस्तूंचा समावेश असतो. या वस्तूंची विल्हेवाट लावण्यापूर्वी त्या सुरक्षितपणे गुंडाळल्या पाहिजेत. काळ्या डब्याचा वापर घरगुती धोकादायक कचऱ्यासाठी केला जातो. यामध्ये रंगांचे डबे, बल्ब, पारा असलेले थर्मामीटर, मुदत संपलेली औषधे व तत्सम इतर वस्तूंचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

RCBच्या स्टार खेळाडूचा मोठा निर्णय! संघाला ठोकला रामराम; आता 'या' संघाकडून खेळताना दिसणार

Bicholim Food Court: डिचोलीतील 'फूड कोर्ट' अंधारात; दीड महिन्यापासून वीज दिवे बंद; व्यावसायिकांचा उदरनिर्वाह धोक्यात

Seattle Center Shooting: अमेरिकेतील सिएटलमध्ये फूड फेस्टिव्हलदरम्यान अंदाधुंद गोळीबार; दोन ठार, पाच जण जखमी Watch Video

Salcete No Development Zone: सासष्टीतील 1.02 कोटी चौमी जमीन 'ना विकास क्षेत्र' करण्याचा प्रस्ताव! 5 गावांचा समावेश, ३० दिवसांच्या आत सूचना व हरकती मागविण्यात आल्या

Goa Development Projects: 'पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनामुळेच गोव्याचा विकास!' सड्या येथे इस्पितळाच्या भूमिपूजनाप्रसंगी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT