Mormugao News Dainik Gomantak
गोवा

मुरगाव पालिका नगराध्यक्ष लिओ राॅड्रीग्स यांनी वास्को मासळी मार्केटची केली पाहणी

नगराध्यक्ष लिओ रोड्रिक्स, मुख्याधिकारी जयंत तारी व नगरसेविका शमी साळकर यांनी दिली भेट

दैनिक गोमन्तक

वास्को : मूरगाव पालिकेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष लिओ राॅड्रीग्स, मुख्याधिकारी जयंत तारी, नगरसेविका शामी साळकर, तसेच मार्केट समिती पदाधिकाऱ्यांनी वास्को येथील तात्पुरत्या मासळी मार्केट मध्ये पाहणी करून तेथील मासळी विक्रेते तसेच फळ विक्रेत्यांच्या अडचणी विषयी माहिती जाणून घेतली. तसेच मुख्य रस्त्यालगत फळ विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना देव दामोदर ट्रस्ट जागेत सामावून घेण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे. (mormugao municipality Mayor Leo Rodriguez inspects the Vasco fish market )

येथील देव दामोदर ट्रस्ट जागेत तात्पुरती शेड उभारून मासळी मार्केट मधील मासळी विक्रेत्यांना स्थलांतर करण्यात आले आहे. तसेच रस्त्यावर बसून फळ विक्री करणाऱ्या फळ विक्रेत्यांना या देव दामोदर ट्रस्ट जागेत सामावून घेतले आहे. दरम्यान या जागेत अजून मासळी विक्रेत्यांना काही त्रूटी जाणवत आहे. त्या त्रुटी मासेविक्रेत्यांनी पालिकेच्या नजरेस आणून दिल्या आहे. या जागेत अजून काही सुधारणा व्हायची आहेत त्या विषयात मुरगावचे नगराध्यक्ष लिओ रोड्रिक्स, मुख्याधिकारी जयंत तारी, नगरसेविका शमी साळकर यांनी संयुक्तरित्या पाहणी करून तात्पुरत्या मासळी मार्केटमधील समस्या जाणून घेतल्या.

दरम्यान येथील एस एल गोम्स मार्गावर या तात्पूॆत्या मार्केटच्या बाजूला मुख्य रस्त्यावर फळ विक्रीचा आपला व्यवसाय थाटून आहेत. वाहन चालक आपली वाहने मुख्य रस्त्यावर पार्क करून फळे घेताना दिसतात. त्यामुळे या मुख्य रस्त्यावरील वाहतूक रहदारीला मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. काही वेळा येथे अपघाताचे प्रकार घडले आहेत.

आता या ठिकाणी मासळी मार्केट झाल्याने लोक वाहने रस्त्यावर पार्क करून मासळी आणण्यासाठी जातात. येथे फळ विक्रेत्यांनी फुटपात तसे रस्त्यावर पार्किंगच्या जागेवर अतिक्रमण करून फळ विक्री करत असल्याने वाहन चालकांना आपली वाहने पार्किंग जागे अभावी मुख्य रस्त्यावर पार्क करावी लागतात.

दरम्यान याची दखल घेऊन नगराध्यक्ष लिओ रोड्रिक्स, मुख्याधिकारी जयंत तारी व नगरसेविका शमी साळकर यांनी सर्व फळ विक्रेत्यांना एकाच छताखाली म्हणजे देव दामोदर ट्रस्टच्या जागेत आणण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यासाठी सदर जागेत काँक्रिटीकरण करून फळ विक्रेत्यांना या जागेस सामावून घेण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

त्यासाठी सर्व फळ विक्रेत्यांची संयुक्त बैठक घेऊन त्यांना विश्वासात घेऊन त्यांचे या मार्केटमध्ये स्थलांतर करण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष लिओ रोड्रिक्स यांनी यावेळी सांगितले. यावेळी नगरसेवक गिरीश बोरकर, उपनगराध्यक्ष अमेय चोपडेकर, नगरसेवक प्रजय मयेकर आदी नगरसेवक उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एकाला अटक

Goa: 'राज्यात घरे कायदेशीर करताना दंडही वसूल करणार', मुख्‍यमंत्र्यांनी दिली माहिती; सहकार्याचे कोमुनिदाद पदाधिकाऱ्यांना आवाहन

Cristiano Ronaldo: रोनाल्डो 'गोव्यात' खेळणार की नाही? सुरक्षा यंत्रणा घेणार निर्णय; देशभरातील फुटबॉलप्रेमी आशावादी

Goa AAP: 'गोव्यात काँग्रेसने जनतेचा विश्‍वास गमावला'! आतिषी यांचे प्रतिपादन; आघाडी करणार नसल्याचा पुनरुच्चार

Goa Politics: खरी कुजबुज; फोंड्यात अशीही बनवाबनवी

SCROLL FOR NEXT