Dangerous Buildings Dainik Gomantak
गोवा

Mormugao municipality: 'त्या' 32 धोकादायक इमारतींवर हातोडा चालवण्याचा मुरगाव नगरपरिषदेचा निर्णय

बहुसंख्य रहिवाशांना पर्यायी निवासस्थान उपलब्ध होत नसल्याने अद्याप इमारती रिकाम्या केलेल्या नाहीत.

गोमन्तक डिजिटल टीम

मुरगाव नगरपरिषदेने (MMC) आपल्या हद्दीतील असुरक्षित इमारतींवर कारवाई सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मानवी वस्तीसाठी धोकादायक असलेल्या अशा 32 इमारती महापालिका अधिकाऱ्यांनी घोषित केल्या आहेत. (Mormugao Municipality)

यापैकी बहुतेक इमारती वास्को शहरात आहेत, उर्वरित बायना, मुंडवेल, मैमोल्लेम, वड्डेम आणि हेडलँड-सडा भागात आहेत. या 32 इमारतींपैकी 30 इमारतींमधील रहिवाशांनी अद्याप जागा रिकामी केलेली नाही. तांत्रिक विभागाने अशा धोकादायक बांधकामांची यादी तयार केली आहे आणि रहिवाशांना जागा खाली करण्यास सांगितले आहे.

तथापि, बहुसंख्य रहिवाशांनी त्यांना पर्यायी निवासस्थान उपलब्ध होत नसल्याच्या कारणास्तव इमारती रिकाम्या केल्या नसल्याचे आढळून आले आहे. मात्र, रहिवाशांच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये यासाठी पालिका अधिकाऱ्यांनी या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

वास्को येथील हॉटेल उर्वशीच्या शेजारी असलेली अगाई मॅन्शन इमारत असुरक्षित घोषित करण्यात आल्याने ती पाडण्यास पालिका अधिकाऱ्यांनी नुकतीच मान्यता दिली आहे.

इमारतीचे काँक्रीटचे भाग कोसळल्याच्या अनेक घटना घडत असल्याने आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या लोकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. यापूर्वी वास्कोतील पुष्पगंधा सहकार भंडारासमोरील पुष्पांजली बिल्डिंगसुद्धा अशीच धोकादायक स्थितीत असल्याने जमीनदोस्त करण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: गोवा सरकार गाढ झोपेत, तर गृहमंत्री त्यांच्या राजकीय अजेंड्यात

Goa Contract Professors: कंत्राटी प्राध्यापकांची होणार चांदी, 'समान वेतन-समान काम' सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट

Goa Crime: गोवा फॉरवर्ड पक्ष युथ विंगच्या उपाध्यक्षावर जीवघेणा हल्ला; कारही फोडली

Julus in Goa: मडगावात ईद ए मिलाद उत्साहात साजरा

Donald Trump: आम्ही रशियासह भारतालाही गमावले! राजनैतिक संबंध विकोपाला गेल्याची ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत

SCROLL FOR NEXT