Mormugao Raja Dainik Gomantak
गोवा

Mormugao Raja: 'मुरगावचा राजा' मंडप पाडण्यास स्थानिकांचा विरोध, अखेर पाडकामाची कारवाई स्थगित

Mormugao Raja Mandap Demolition: समितीतर्फे गेल्या १८ वर्षांपासून सडा येथील ‘एमपीए’च्या जागेत गणेशोत्सव साजरा केला जात आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

समितीतर्फे गेल्या १८ वर्षांपासून सडा येथील ‘एमपीए’च्या जागेत गणेशोत्सव साजरा केला जात आहे. पण ‘एमपीए’ने ही जागा आपली असल्याचे उच्च न्यायालयात सिद्ध केल्यानंतर तो मंडप पाडण्याचा आदेश उच्च न्यायालयाने २८ ऑगस्ट २०२६ रोजी मुरगाव पालिकेसह संबंधित विभागांना दिला होता.

आज सकाळी घटनास्थळी मुरगावचे मामलेदार प्रवीणजय पंडित, पोलिस अधीक्षक गुरुदास कदम, पोलिस निरीक्षक शेरिफ जॅकीस, वैभव नाईक, आनंद शिरोडकर, अमरनाथ पाशी, आयआरबी पोलिस दल उपस्थित होते. तसेच हा मंडप पाडण्यासाठी जेसीबीही आणला होता.

यावेळी मुरगावचा राजा गणेशोत्सव समितीचे पदाधिकारी ओमकार दुर्भाटकर, उमेश मांद्रेकर, अनिल काणकोणकर, माजी नगराध्यक्षा भावना भोसले, वेदांत चोडणकर, कांता मांद्रेकर, उद्धव पोळ इतर पदाधिकाऱ्यांसह नागरिकांनी पाडकामास तीव्र विरोध दर्शविला. मंडप पाडल्यास आम्ही आत्मदहन करण्यास मागे-पुढे पाहणार नाही, अशा इशाराही अधिकाऱ्यांना दिला.

‘एमपीए’ने जागा लीजवर द्यावी

‘एमपीए’ने मुरगाव राजाच्या मंडपाची जागा लीजवर देण्याची मागणी माजी नगरसेवक नीलेश नावेलकर यांनी केली आहे. ‘एमपीए’ने सडा येथील सायंतारा थिएटर, मैदान तसेच बंदरातील काही धक्के लीजवर दिले आहेत. त्याचप्रमाणे या मंडपाची जागा समितीला लीजवर देण्याचा नावेलकर यांचा प्रस्ताव आहे. मंडपाची जागा सुमारे १३० चौ.मी. आहे. ‘एमपीए’ने ही जागा लीजवर देण्याचा विचार करावा, असे नावेलकर यांचे म्हणणे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT