Damodar Bhajani Saptah Dainik Gomantak
गोवा

Damodar Bhajani Saptah: वास्‍को सप्‍ताहात ‘जायंट्स व्हील’वर बंदी, प्रशासन सज्ज!जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी; अतिरिक्त पोलिस तैनात

Giant Wheel ban Mormugao: यंदाच्या सप्ताहात मुरगाव पालिकेतर्फे उभारण्यात येणाऱ्या ‘जायंट्स व्हील’ला पूर्णपणे बंदी घालण्यात आल्याची माहिती त्‍यांनी दिली.

गोमंतक ऑनलाईन टीम

वास्को: येथील श्री दामोदर भजनी सप्ताहाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी एग्ना क्‍लिटस यांच्या अध्यक्षतेखाली आज गुरुवारी पाहणी करण्यात आली. यंदाच्या सप्ताहात मुरगाव पालिकेतर्फे उभारण्यात येणाऱ्या ‘जायंट्स व्हील’ला पूर्णपणे बंदी घालण्यात आल्याची माहिती त्‍यांनी दिली.

हा प्रसिद्ध भजनी सप्‍ताह १८ ऑगस्‍ट रोजी साजरा होणार आहे. सप्ताहासाठी मोठ्या संख्येने भाविक येत असल्याने त्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार आहे. मंदिर परिसर तसेच सप्ताहानिमित्त भरणाऱ्या फेरीच्या जागेची पाहणी करून क्‍लिटस यांनी संबंधित विभागांना आवश्यक सूचना दिल्या.

सप्ताहाच्या फेरीत खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी एकच जागा निश्चित करून देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी मुरगाव पालिकेला दिले. तसेच देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी सप्ताह समिती आणि पोलिस अधिकाऱ्यांनी विशेष खबरदारी घ्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक टिकम सिंह वर्मा यांनी कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. तर, वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांनी सप्ताहात येणाऱ्या प्रत्येक भाविकाला सुरळीतपणे देवदर्शन घेता यावे, यासाठी पोलिस आणि सप्ताह समितीचे पदाधिकारी आपली जबाबदारी पार पाडतील, असे सांगितले. वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी अतिरिक्त पोलिस तैनात करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सप्ताहासाठी येणाऱ्या वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था पूर्वीच्या मासळी बाजाराच्या जागेत तसेच एचपीसीएलच्या खुल्या जागेत करण्यात आली आहे, अशी माहिती वाहतूक पोलिस निरीक्षक एलविटो रॉड्रिगीस यांनी दिली.

यावेळी मुरगावचे उपजिल्हाधिकारी प्रतापराव गावकर, मामलेदार प्रवीणजय पंडित, मुरगाव पोलिस अधीक्षक गुरुदास कदम, वास्को पोलिस निरीक्षक वैभव नाईक, मुरगाव पालिका अधिकारी योगेश देसाई, सप्ताह बाजारकर व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रशांत जोशी यांच्‍यासह अनेक मान्‍यवर आणि विविध सरकारी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

खाद्यपदार्थांसाठी एकच जागा

सप्ताहाच्या फेरीत खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी एकच जागा निश्चित करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी मुरगाव पालिकेला दिले आहेत. भाविकांना कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचनाही सप्ताह समितीला करण्यात आल्या.

वाहतूक नियंत्रणासाठी विशेष नियोजन

सप्ताहात मोठ्या संख्येने भाविक येणार असल्याने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त पोलिस दल तैनात करण्यात येणार आहे. गर्दी तसेच वाहतूक नियंत्रणासाठी पोलिसांकडून विशेष नियोजन करण्यात येणार असल्याचे पोलिस अधीक्षक टिकम सिंह वर्मा यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

Goa Mega Project: कारापूर-सर्वण मेगा प्रकल्पावर 2 दिवसांत निर्णय, शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; अधिकाऱ्यांना कागदपत्रे तपासण्याच्या सूचना

Indian Cricketers Ban: भारतीय क्रिकेटमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा फ्रॉड! अंडर-19 वर्ल्ड कप स्टार अडकला जाळ्यात; 65 खेळाडूंवर बंदी

Goa Accident: गोव्यात अपघातांची धडकी भरवणारी आकडेवारी! 19 महिन्यांत 1107 जणांचा मृत्यू; दिवसाला दोन जीवांचा बळी

Shukra Gochar 2026: वैभव अन् संपत्तीचा कारक बदलणार चाल! शुक्राचे नक्षत्र गोचर 5 राशींसाठी ठरणार वरदान; धनाचा होणार वर्षाव

SCROLL FOR NEXT