गोवा प्रदेश काँग्रेस (Goa Pradesh Congress) समितीला विधानसभा निवडणुकीपूर्वी धक्के पे धक्का देण्याचे सत्र सुरूच आहे. मुरगाव काँग्रेसचे खंदे समर्थक देस्तेरो परिसरातील युवक विपुल विवेक खोब्रेकर (Vipul Vivek Khobrekar) यांची भारतीय जनता (BJP) युवा मोर्चा मुरगाव शाखेच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. यामुळे मुरगावात काँग्रेसला गळती लागण्यास सुरुवात झाल्यात जमा.
पुढील वर्षी राज्यात होणारी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय पक्षांना त्यांच्या निकटवर्तीय सदस्यांनी सोडचिठ्ठी देण्याचे सत्र सुरूच ठेवले आहे. यात जास्त फटका गोवा प्रदेश काँग्रेस समितीला बसत असल्याने त्यांना येणारी विधानसभा निवडणूक कदाचित जड जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात बोलण्यात येत आहे. काँग्रेस पक्षाचे खंदे समर्थक मुरगाव देस्तेरो भागातील विवेक खोब्रेकर यांचे पुत्र विपुल विवेक खोबरेकर याने मुरगाव भारतीय जनता पक्षाच्या भारतीय जनता युवा मोर्चात प्रवेश करताच विपुल खोब्रेकरला भाजयुमो च्या उपाध्यक्षपदी बढती दिली. यामुळे मुरगावात एका प्रकारे काँग्रेस जबरदस्त फटका बसण्याची शक्यता आहे.
गेली अनेक वर्षे खोब्रेकर कुटुंब प्रामाणिकपणे काँग्रेसचे समर्थक असून त्यांच्या कुटुंबातील युवक विपुल विवेक खोबरेकर याने भाजपमध्ये प्रवेश केल्याने कदाचित विपुल आणखीन युवा सदस्यांना मुरगांव भाजपात घेऊन जाणार अशी शक्यता नाकारता येत नाही. सोमवार मुरगावचे आमदार तथा नगरविकास मंत्री मिलिंद नाईक यांनी त्यांच्या शासकीय बंगल्यावर एका छोट्या कार्यक्रमात विपुल खोब्रेकर यांचे भाजपात स्वागत केले. यावेळी भारतीय जनता युवा मोर्चा मुरगांवचे अध्यक्ष योगेश बांदेकर, मुरगावचे नगरसेवक प्रजय मयेकर, माजी उपनगराध्यक्ष शशिकांत परब व इतर भाजप युवा सदस्य उपस्थित होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.