Mormugao coal pollution issue Dainik Gomantak
गोवा

Coal Pollution: कोळसा दुर्गंधीचा विषय चिघळला! आमदार आमोणकर, अदानीच्या अधिकाऱ्यांमध्ये गरमागरम चर्चा Watch Video

Sankalp Amonkar: बंदरातील कोळसा दुर्गंधीमुळे सडा, बोगदा, जेटी व इतर रहिवासी त्रस्त झाले आहेत. या विरोधात आमोणकर यांनी शेकडो रहिवाशांसह ११ फेब्रुवारीला अदानी कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा नेला होता.

गोमन्तक डिजिटल टीम

Coal pollution Goa : कोळसा दुर्गंधी व प्रदूषण रोखण्यासाठी यापूर्वी काय केले, तसेच भविष्यात कोणती सुधारणा करणार, यासंबंधीची माहिती २४ तासांत लेखी स्वरूपात देण्याची मागणी मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी केली होती. ही मागणी मुरगाव बंदरात कोळसा हाताळणी करणाऱ्या अदानी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मान्य केली आहे. मात्र, ही समस्या सुटेपर्यंत लढा सुरूच राहील, असा इशारा आमोणकर यांनी दिला.

बंदरातील कोळसा दुर्गंधीमुळे सडा, बोगदा, जेटी व इतर परिसरातील रहिवासी त्रस्त झाले आहेत. या विरोधात आमोणकर यांनी शेकडो रहिवाशांसह ११ फेब्रुवारीला अदानी कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा नेला होता. त्यावेळी तीन दिवसांमध्ये दुर्गंधी बंद न झाल्यास कायदा हाती घेण्याचा इशाराही दिला होता.

तीन दिवसांनंतर दुर्गंधी कमी झाली. मात्र, सोमवारपासून पुन्हा दुर्गंधी वाढली आहे. त्यामुळे आमोणकर यांच्यासह नागरिकांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी अदानी कंपनीच्या कार्यालयात जाऊन कंपनीचे मुख्य अधिकारी संदीप आणि भूषण यांच्याशी चर्चा केली. यावेळी गरमागरम चर्चा झाली. आमोणकर यांनी कंपनीच्या एकूण भूमिकेविषयी तीव्र संताप व्यक्त केला.

दुर्गंधी कायमस्वरूपी बंद करावी. हा कोळसा लोकांच्या आरोग्यासाठी घातक असल्याने इंडोनेशियातील दगडी कोळशाची आयात येथे करू नये, असे त्यांनी सांगितले. यावेळी नगरसेविका श्रद्धा आमोणकर, रवींद्र भवनचे अध्यक्ष जयंत जाधव, उपाध्यक्ष डॉ. धर्मेंद्र प्रभुदेसाई, प्रसाद प्रभुगावकर, मुरगाव मतदारसंघाचे प्रभारी संतोष केरकर, शांताराम पराडकर, रवळनाथ पेडणेकर, सामाजिक कार्यकर्ते सुरेश नाईक, सांतान आदी उपस्थित होते.

रेलगाड्या मिळत नसल्याने कोळसा पडून

यावेळी कंपनीचे अधिकारी संदीप यांनी कोळसा आयात बंद करण्यासंबंधी कोणताही निर्णय घेऊ शकत नसल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी कंपनीतर्फे कोणत्या उपाययोजना केल्या, यासंबंधी माहिती दिली. तसेच उपाययोजनांमुळे दुर्गधी कमी झाल्याचे त्यांनी सांगितले. कोळसा वाहतूक करण्यासाठी रेलगाड्या मिळत नसल्याने काहीवेळा कोळसा पडून राहतो. ही समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करीत आहोत, असे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT