Sankalp Amonkar  Dainik Gomantak
गोवा

संकल्प आमोणकरांच्या विधानावर मुरगाव 'भाजप'ची टीका

मुरगावात मिठाई वाटून विद्यमान आमदार आपला विजय साजरा करत...

दैनिक गोमन्तक

वास्को: विधानसभेत उभे राहून ‘मुरगावात पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे’. ‘जनता दहशतीखाली राहत आहे,’ अशी विधाने करून स्वतःची खिल्ली उडवणारी व्यक्ती मुरगावात अपघाती आमदार बनली आहे, अशी टीका मुरगाव भाजप मंडळातर्फे आमदार संकल्प आमोणकर यांच्या विधानावर करण्यात आली. मुरगावात मिठाई वाटून विद्यमान आमदार आपला विजय साजरा करीत असले तरी माजी आमदार मिलिंद नाईक यांनी प्रत्येक घरात नोकऱ्यांबरोबर यशस्वीरित्या विकास साधला आहे,अशी माहिती राज्य भाजप कार्यकारिणी सदस्य जयंत जाधव यांनी दिली.

वास्कोत आयोजित पत्रकार परिषदेत मुरगाव भाजप मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी वरील माहिती दिली. यावेळी मुरगाव भाजप गटाध्यक्ष संजय सातार्डेकर, मुरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष दामोदर कासकर, नगरसेवक दामू नाईक, प्रजय मयेकर, कृणाली मांद्रेकर, रामचंद्र कामत,लिओ रॉड्रीगीस,मंजुषा पिळर्णकर,दया नाईक उपस्थित होते.

जाधव म्हणाले,की मुरगावातील बोगदा, रूमडावाडा,जेटी भाग डोंगराळ असल्याने तेथे पावसाळ्यात धोका निर्माण होतो. यासाठी गेली अनेक वर्षे मुरगाव पालिका त्यांना नोटीस बजावत आहे. उगाच कुठलेही आरोप आमदारांनी पालिकेवर करू नयेत. पावसाळ्यात दुर्घटना घडल्यास आमदार स्वतः जनतेची काळजी घेणार, तर त्यांनी असे लिहून द्यावे, असे दामोदर कासकर यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Makharotsav in Goa: 16व्या शतकातील परंपरा, पोर्तुगीज आक्रमणातून वाचलेल्या मूर्तींचा अनोखा उत्सव; देवीच नाही तर गंडभैरवाचाही भरतो 'मखरोत्सव'

Navratri Special: कामालाच आनंद मानणारी, आव्हानांना सामोरे जाण्याची ऊर्जा देणारी 'महिला उद्योजिका'; दुर्गेचे आधुनिक रुप

Seva Pakhwada: राज्याच्या, देशाच्या प्रगतीचे चित्र उमटललेल्या कलाकृती; 21 व्या शतकातील भारत आणि गोवा प्रदर्शन

Siolim: शिवोलीवासीयांसाठी आनंदाची बातमी! पाणीप्रश्न कायमचा सुटणार; आसगाव, हणजूण, वागातोर, बादे, शापोरा परिसरालाही फायदा

Goa Opinion: रामाची ‘फाइल’ कुणी व कशासाठी दिली हे जाहीर होईल का? गोव्यात बहरतोय ‘कंत्राटी मारेकऱ्यां’चा व्यवसाय

SCROLL FOR NEXT