Road Block: तुम्ही बेळगाव किंवा आजूबाजूच्या भागांमधून गोव्याला येण्याच्या तयारीत आहात का? हो, तर काहीवेळ थांबून ही बातमी नीट वाचा कारण सध्या पर्ये-साखळीमार्गे गोव्यात येणारा मार्ग स्थानिक मंदिराच्या वादामुळे बंद करण्यात आला आहे. शुक्रवार (२० डिसेंबर) रात्रीपासून काही स्थानिक आंदोलकांकडून हा मार्ग बंद करण्यात आला असल्याने बेळगाव किंवा इतर परिसरांमधून येणा-जाणाऱ्यांसाठी मोर्ले - होंडाचा मार्ग मोकळा करून देण्यात आलाय.
स्थानिक मंदिराच्या वादामुळे काल रात्रीपासून साखळी - चोर्ला घाट मार्गावर वाहतूक करणाऱ्यांची मोठी गैरसोय झाली असून कामगार वर्गाला देखील याचा फटका बसलाय आणि हा मार्ग वाहतुकीसाठी कधी खुला होईल याचा खात्रीशीर माहिती उपलब्ध नाही.
बेळगावमधून साखळीमार्गे गोव्यात येण्याचा रस्ता जरी बंद असला तरीही तुम्ही मोर्ले - होंडा मार्गाचा वापर करू शकता. चोर्ला घाटातून पर्ये साखळीमार्गे खाली न उतरता केळवाड्याच्या मार्गे पणसुलीहून मोर्लेचा मार्ग पकडा.
शेवटी तुम्ही सत्तरी तालुक्यात पोहोचणार आहात. पुढे होंडा येथील जंक्शनवरून एक रास्ता फोंडा, दुसरा साखळी, तिसरा वाळपईला जातो, त्यामुळे तुम्ही आवश्यक मार्ग अगदी सहज निवडू शकता.
पर्ये येथील श्री भूमिका देवस्थानचा राखणदार म्हणून परिचित असलेल्या साखळेश्वर देवस्थानात माजिक बांधवांनी एकतर्फी पूजा केल्याने वाद उद्भवला होता. साखळेश्वर देवस्थानात उठलेल्या वादावरून चौघांवर गुन्हे दाखल करण्यासोबत देवस्थान २४ तारखेपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश प्रशासनाने दिला, त्यामुळे संतप्त झालेल्या जमावाने रात्री पर्ये-साखळी मार्गावर टायर्स जाळून वाहतूक अडवली होती, तसेच पोलिसांवर दगडफेक केली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.