Shacks  Gomantak Digital Team
गोवा

Morjim News : मोरजी किनारी पलंग थाटून अतिक्रमण! बेकायदा शॅक्स व्यवसाय सुरूच

कारवाईची मागणी : बिगर गोमंतकीय व्यावसायिक कायदे धाब्यावर बसवून अतिक्रमण करत असल्याचे दिसत होते.

गोमन्तक डिजिटल टीम

Morjim News : पर्यटन खाते दरवर्षी पर्यटन हंगामात किनाऱ्यावर तात्पुरते शॅक उभारण्यासाठी परवाने देते, आणि हे शॅक रेस्टॉरंट 31 मे पर्यंत हटवणे बंधनकारक असते. आणि हे शॅक्स हटवल्याचेही किनारी भागात दिसून येते. परंतु मोरजी किनारी भागात खासगी जागेत उभारलेले शॅक्स अजूनही कार्यरत आहेत. बिगर गोमंतकीय शॅक्स व्यावसायिक किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात लाकडी पलंग घालून अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे काल बुधवार, 14 रोजी आढळून आले. शिवाय आईस्क्रीमवालेही किनाऱ्यावर व्यवसाय करताना दिसत होते.

बेकायदा व्यवसाय करणाऱ्यांवर पोलिस आणि पर्यटन पोलिसांनी कारवाई करावी,असे निर्देश नुकतेच पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी दिले होते. लाकडी पलंग घालून किनाऱ्यावर अतिक्रमण करणाऱ्यांवरही कारवाईची सूचना अधिकाऱ्यांना त्यांनी केली होती. परंतु बिगर गोमंतकीय व्यावसायिक कायदे धाब्यावर बसवून अतिक्रमण करत असल्याचे दिसत होते.

मोरजी पंचायत क्षेत्रातील विठ्ठलदास वाडा किनाऱ्यावर खासगी जागेत पर्यटन हंगाम संपून जून महिना अर्धा संपत आला, तरीही रेस्टॉरंट सुरू आहेत. तिथे स्वच्छता राखली जात नाही. प्रदूषण नियंत्रणचा ‘ना हरकत दाखला’शिवाय शॅक व्यावसायिक खासगी जागेत व्यवसाय करत आहेत. यावर कारवाई का होत नाही,असा सवाल राया शेट्ये यांनी केला आहे.

आम्ही किनाऱ्यावर फिरायला आलो होतो, त्यावेळी दोन वाहने किनाऱ्यावर थेट फिरताना आम्ही पाहिली. शिवाय इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात लाकडी पलंगही किनाऱ्यावर दिसून आले. चेंजिंग रूम, पार्किंग व्यवस्था या किनाऱ्यावर कसलीच सुविधा नाही.

-नितीन गडकर, पर्यटक पुणे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT