Morjim News  Dainik Gomantak
गोवा

Morjim News : पूर्वीचे शिक्षकच न दिल्यास वर्गावर बहिष्‍कार; अल्‍वारिस हायस्‍कूल पालक संघाचा इशारा

शिक्षक भरती : पालक-शिक्षक संघाची बैठक

गोमन्तक डिजिटल टीम

मोरजी येथील पीटर अल्‍वारिस मेमोरियल हायस्कूलच्या पालक-शिक्षक संघाची बैठक नुकतीच झाली. त्‍यात काही ठराव घेण्‍यात आले. जे दोन शिक्षक पूर्वी कंत्राटी पद्धतीवर घेतले होते, त्याच शिक्षकांना परत घ्या; अन्यथा १९ जुलैपासून आम्ही आमच्या मुलांसहित वर्गावर बहिष्कार टाकू, असा इशारा पालक-शिक्षक संघाचे अध्यक्ष प्रकाश बागकर यांनी विद्यार्थी आणि पालकांच्या उपस्थितीत दिला.

पीटर अल्‍वारिस मेमोरियल हायस्कूलमध्‍ये दोन शिक्षक कंत्राटी पद्धतीने घेतले होते. त्यांची मुदत संपल्यानंतर त्यांना मुदतवाढ देण्यात आली नाही.

कायद्यानुसार आम्ही नवीन दोन शिक्षक घेतले असल्याची माहिती हायस्कूलच्‍या चेअरमन श्रीमती परेरा यांनी दिली; तर पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष प्रकाश बागकर व इतर पालकांचे म्हणणे आहे की पूर्वीचे शिक्षक आम्हांला हवेत, अन्‍यथा आम्ही विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणार नाही.

आमची मागणी आम्ही लेखी स्वरूपात शिक्षण खात्याला कळवणार आहोत. पूर्वीचे जे शिक्षक होते, ते शिक्षक चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांना शिकवत आहेत आणि विद्यार्थीही प्रगती साधत आहेत. त्‍यांना कायम करावे.

प्रकाश बागकर, पालक-शिक्षक संघ अध्‍यक्ष

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ओळखणंही झालं कठीण! WWE दिग्गज John Cenaचा धक्कादायक लूक; फोटो पाहून चाहतेही अवाक्!

Ardh Kendra Yog 2026: बँक बॅलन्स वाढणार, सगळ्या चिंता मिटणार! 'अर्धकेंद्र योग' बदलणार 5 राशींचे भाग्य; धनाचा होणार वर्षाव

Bicholim Heavy Rain: डिचोलीत पावसाचा पुन्हा तडाखा; दोन ठिकाणी झाडे कोसळली

Indus Waters Treaty Row: "...तर हात कापून टाकू!" सिंधु जल करारावरुन पाकिस्तानी मंत्र्यांचा जळफळाट; दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकड्यांची भारताविरोधात आगपाखड

'एमआरएम' गेमचेंजर की नुसताच प्रयोग?

SCROLL FOR NEXT