Morjim Gramsabha Dainik Gomantak
गोवा

Morjim: हॉटेलचे रशियन फलक हटवा, गावात 25 मीटरचे रस्ते नकोत; मोरजी ग्रामसभेत ग्रामस्थांची मागणी

Morjim Gramsabha: तेमवाडा मोरजी किनारी भागात पर्यटन खात्याकडून जो पार्किंग प्रकल्प उभारण्यात येत आहे. तो कायद्यानुसारच उभारावा, अशी सूचना ग्रामस्थांनी केली.

Sameer Panditrao

मोरजी: मोरजीच्या ग्रामसभेत मोरजी पंचायत क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पुन्हा एकदा रशियन फलक हॉटेल व्यवसायिक लावत आहेत. त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. त्यावर सरपंच पवन मोरजे यांनी शब्द देऊन संबंधित मालकांना रशियन भाषेऐवजी इंग्रजी, मराठी, कोकणी भाषेत फलक लावण्यास सूचना करीन, अशी ग्वाही दिली.

शिवाय तेमवाडा मोरजी किनारी भागात पर्यटन खात्याकडून जो पार्किंग प्रकल्प उभारण्यात येत आहे. तो कायद्यानुसारच उभारावा, अशी सूचना ग्रामस्थांनी केली. शिवाय पाणी समस्या गावातील २५ मीटरचे रस्ते रुंदीकरण नकोतच, असाही ठराव मंजूर करण्यात आला.

मोरजी पंचायतीची ग्रामसभा सरपंच पवन मोरजे उपसरपंच सुप्रिया पोके ,पंच मंदार पोके, पंच रजनी शिरोडकर, पंच स्वप्निल शेट गावकर ,पंच सुरेखा शेट गावकर, पंच फटू शेटगावकर, पंच विलास मोरजे, पंच मुकेश गडेकर आदी उपस्थित होते.

सुरुवातीला सरपंच पवन मोरजे यांनी लईराई देवीच्या भक्तगणांवर जी आपत्ती ओढवलेली आहे. शिवाय भारत-पाकिस्तान युद्धात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

पंचायत सचिव धावसकर यांनी मागच्या सभेचा इतिवृत्तांत वाचून कायम केला. मुख्य जंक्शनवर सीसीटीव्ही बसवावेत अशी मागणी गोविंद पोके यांनी केली. शिवाय काही नागरिक खाजगी वाहने मोठ्या प्रमाणात भाडेपट्टीवर देतात त्यावर पंचायत काय कारवाई करेल, असा सवाल एका नागरिकाने उपस्थित केला. त्यावर योग्य विचार केला जाईल, असे सरपंच मोरजे यांनी सांगितले.

ग्रामसभेला उपस्थिती नगण्य असल्यामुळे लोकांचे प्रश्न पंचायत सोडवत नाही का? असा सवाल दिलीप सावंत, अनंत शेट गावकर, सुभाष शेटगावकर यांनी उपस्थित केला. सरपंच पवन मोरजे यांनी आभार मानले.

पार्किंग व्यवस्था कायदेशीर करा

मोरजी तेमवाडा किनारी भागात पर्यटन खाते अंतर्गत नऊ कोटी रुपये खर्च करून पार्किंग प्रकल्प उभारण्याचे काम सुरू आहे, ती व्यवस्था सरकारचे सर्व कायदेशीर परवाने घेऊनच पूर्ण करावेत. अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली. आता समुद्र स्नानासाठी मोठ्या प्रमाणात लोक किनाऱ्यावर येणार आहेत, त्यांच्या पार्किंग साठी कशी पंचायत सोय करणार, असा सवाल अनंत शेटगावकर यांनी केला. मरडी वाडा येथे पाच वर्षापासून नळांना पाणी येत नाही. त्या जलवाहिनीवर कोणीतरी बांधकामे केली आहेत का? याची तपासणी पंचायत का करत नाही, असा सवाल सुभाष शेटगावकर यांनी उपस्थित केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tiger In Goa: गोव्यात फिरतोय भला मोठा 'पट्टेरी वाघ'? पेडणे येथे दिसल्याचा दावा; लोकांमध्‍ये भीतीचे वातावरण

Goa Politics: खरी कुजबुज; फोंड्यात धक्कादायक उमेदवारी

Omkar Elephant: सावधान! ‘ओंकार हत्ती’ गोव्याच्या सीमेवर; वन खाते पुन्हा सतर्क

Goa Crime: नोकऱ्यांचे आमिष दाखवून महिलांवर अत्याचार! आरोपीचे ‘हवाला कनेक्शन’ उघड; बडे मासे सापडण्याची शक्यता

Goa Mining: खाण क्षेत्र सुधारणांसाठी गोव्याला 400 कोटी! मुख्यमंत्र्यांनी मानले PM मोदींचे आभार; राज्य सरकारच्या प्रयत्नांना बळ

SCROLL FOR NEXT