Morjim Tembwada: सांगितला पार्किंग प्रकल्प, प्रत्यक्षात हॉटेलसाठी रस्ता? टेंबवाड्यात नागरिक संतप्त; गुन्हे नोंदवण्याची केली मागणी

Morjim Tembwada Beach Parking Project: स्थानिक नागरिक व पंचायतीलाही विश्वासात न घेता टेंबवाडा येथील समुद्रकिनारी पार्किंग प्रकल्पाच्या नावावर मोठ्या हॉटेलला रस्ता करण्याचा घाट सरकारने घालत आहे.
Morjim Tembwada Beach parking project
Morjim Tembwada parking project Canva
Published on
Updated on

मोरजी: स्थानिक नागरिक व पंचायतीलाही विश्वासात न घेता टेंबवाडा येथील समुद्रकिनारी पार्किंग प्रकल्पाच्या नावावर मोठ्या हॉटेलला रस्ता करण्याचा घाट सरकारने घालत आहे. त्यासाठी वाळूच्या तेंबांचे सपाटीकरण केले आहे. या विरोधात मांद्रे पोलिसांनी गुन्हे नोंदवावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय बर्डे, शंकर पोळजी, मयूर शेटगावकर व अल्बर्ट फर्नांडिस यांनी केली.

टेंबवाडा किनारी पर्यटन खाते आठ कोटी रुपये खर्च करून बहुउद्देशीय पार्किंग प्रकल्प उभारत आहे. २९ रोजी वाळूच्या टेंबांसह जागेचे सपाटीकरण करण्यात येत होते. यावेळी स्थानिक मयूर शेटगावकर व अल्बर्ट फर्नांडिस यांनी या कामाला विरोध करत अगोदर सीआरझेड, वन्य विभागाचे परवाने दाखवा व नंतरच काम सुरू करा, अशी मागणी केली.

Tembwada Morjim mollusk harvesting
Mollusk Harvesting GoaDainik Gomantak

दरम्यान, मांद्रे पोलिसांनी मयूर शेटगावकर ताब्यात घेतले व मांद्रे पोलिस स्टेशनवर नेले होते. याचा निषेध करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते टेंबवाडा किनारी एकत्र आले होते. पोलिसांनी जे आवाज उठवतात त्यांचा आवाज दडपण्याऐवजी जे निसर्गाची हानी करत आहेत त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी या कार्यकर्त्यांनी यावेळी केली.

Morjim Tembwada Beach parking project
Morjim: ओहोळात साचलेल्या घाण पाण्यामुळे पंडीरवाडा-मोरजीत रोगराईचा धोका; कचरा टाकणाऱ्यांविरुद्ध कारवाईची मागणी

शंकर पोळजी म्हणाले की, सरकारने वेगवेगळ्या माध्यमातून जनहिताविरुद्ध प्रकल्प उभारण्याचा घाट घातलेला आहे. पर्यावरणाची ऱ्हास केली जात आहे. गरिबांना हटविण्याचाही त्यांचा डाव आहे, असे ते म्हणाले.

Morjim Tembwada Beach parking project
Morjim: मोरजी समुद्रकिनाऱ्यावर 8 कोटींचा प्रकल्प; पार्किंग समस्येवर कायमचा तोडगा निघणार? स्थानिकांचा मात्र विरोध

बर्डे यांची आरोलकरांवर टीका

संजय बर्डे यांनी यावेळी आमदार जीत आरोलकर यांच्यावर बरीच टीका केली. आरोलकर यांना मांद्रेतील मतदारांनी निवडून दिले ते गावातील अंतर्गत रस्ते करण्यासाठी किनाऱ्यावर सीआरझेडचे उल्लंघन करून पार्किंग प्रकल्प किंवा बिगर गोमंतकीयांना हॉटेल वा रस्ते उभारण्यासाठी नव्हे, असे बर्डे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com