Morjim: ओहोळात साचलेल्या घाण पाण्यामुळे पंडीरवाडा-मोरजीत रोगराईचा धोका; कचरा टाकणाऱ्यांविरुद्ध कारवाईची मागणी

Morjim Drain Blockage: मोरजी पंचायत क्षेत्रातील बँक ऑफ बडोदा व्हाया पंडीर ते खिंडपर्यंत एक पारंपरिक ओहोळ आहे. या ओहोळामध्ये पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी सोय असते.
Morjim
MorjimDainik Gomantak
Published on
Updated on

मोरजी: मोरजी पंचायत क्षेत्रातील बँक ऑफ बडोदा व्हाया पंडीर ते खिंडपर्यंत एक पारंपरिक ओहोळ आहे. या ओहोळामध्ये पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी सोय असते; परंतु हल्ली पंडीरवाड्यावर या ओहोळामध्ये मोठ्या प्रमाणात केरकचऱ्यासह घाण पाणी साचल्याने आरोग्याची समस्या निर्माण होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

आरोग्य खात्याने याकडे लक्ष देऊन हे सांडपाणी कुणी या ओहोळामध्ये सोडतो की काय, याचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी काही नागरिक करत आहेत. या ओहोळामध्ये सध्या ज्या पद्धतीचे घाण पाणी साठलेले आहे. त्यामुळे आरोग्याची समस्या निर्माण होऊ शकते. डेंग्यू, मलेरियासारख्या आजार फैलावण्याची भीती नागरिक उपस्थित करत आहेत.

Morjim
Goa Crime: परदेशात नोकरी करायचं स्वप्न अखेर स्वप्नच राहिलं, मडगावात रेल्वे रूळावर आढळला युवकाचा मृतदेह

घरातील सांडपाणी किंवा कचऱ्याची विल्हेवाट प्रत्येकाने लावण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. पंचायत आपल्या पद्धतीने गावागावांतील घराघरांतील केरकचरा उचलण्यासाठी उपक्रम राबवत असतात.

कामगार, मजुरांद्वारे घराघरांतील केरकचरा उचलला जातो; परंतु या ओहोळ, पोयमध्ये केरकचरा फेकण्याचेही प्रकार घडत आहेत. काही स्वतःला सामाजिक कार्यकर्ते समजले जाणारेही स्वतः केरकचरा फेकतात.

Morjim
Goa Congress Protest: ...तरी आम्हाला रोखू शकत नाही! काँग्रेस नेत्यांचा भाजपला इशारा, पणजीत 'ईडी' समोर निदर्शने

पंचायत मंडळाने लक्ष द्यावे!

मोरजी पंचायत क्षेत्रात जेवढे ओहोळ, नाले, पोय आहेत. त्या पोय परिसरातील जेवढी घरे, आस्थापने आहेत. ती घरे, आस्थापने आपला केरकचरा किंवा सांडपाणी या ओहोळ, पोयमध्ये सोडत नाहीत ना, याची पाहणी पंचायत मंडळाने करून जे कोणी सांडपाणी सोडतात, त्यांना ताकीद देऊन पुन्हा अशा घटना घडल्या तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com