Khari Kujbuj Political Satire Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: खरी कुजबुज; मोरजीच्या खुनाचे पुढे काय?

Khari Kujbuj Political Satire: मुख्‍यमंत्री किंवा पोलिस त्‍यांची नावे फोडत नाहीत. अशा स्‍थितीतही विजय सरदेसाई जनतेला दिलेला शब्‍द का पाळत नाहीत? संबंधितांची ते थेटपणे नावे का घेत नाहीत?

गोमन्तक डिजिटल टीम

मोरजीच्या खुनाचे पुढे काय?

मोरजीला उमाकांत खोत यांचा खून झाल्याचे प्रकरण आता विस्मृतीत गेल्यातच जमा झाले आहे. एवढा मोठा प्रकार घडूनही म्हणावे तसे त्याचे पडसाद उमटले नाहीत. हे असे होणार असे गृहित धरून वावरणारा वर्ग आता उदयाला आल्याचे बोलले जात आहे. हे प्रकरण का घडले यावरही प्रकाश पडलेला नाही. वरचावाडा येथे काम सुरू असलेल्या ठिकाणी कामाला परवानगी मिळाल्याचे फलक लावण्यात आले होते. त्यामुळे हा नेमका प्रकार काय याविषयी गुढ आहे. आता तर प्रकरण विस्मृतीत गेल्याने पुढे काय हाच मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. ∙∙∙

राय सरपंच निवडीस गोवा फॉरवर्डचा पाठिंबा?

एका बाजूने भाजपवर टीका करणे व दुसऱ्या बाजूला सरकारी पक्षाला सरपंच निवडीस मदत करणे, हे गोवा फॉरवर्डचे कसले डावपेच? हा प्रश्न सध्या कुडतरी मतदारसंघात उपस्थित केला जात आहे. पाच दिवसांपूर्वी रायच्या सरपंचपदी मिंगेलीना डिसोझा हिची निवड करण्यात आली. ती ६ विरूद्ध ४ मतांनी निवडून आली. या सहा मतांत चार भाजपचे व दोन गोवा फॉरवर्डचेच्या पंचांचा समावेश आहे, असे बोलले जात आहे. मारियो व ओसवाल्ड या गोवा फॉरवर्डच्या पंचांनी मिंगेलीनाच्या बाजूने मत दिले. आता हे दोन्ही पंच आपल्या पक्षाचे नाहीत, हे गोवा फॉरवर्डने स्पष्ट करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. जासिंता डायस या अपक्ष आमदार आलेक्स रेजिनाल्डच्या सरपंचावर अविश्वास आणून तिला पदच्यूत करण्यात आले होते. गोवा फॉरवर्ड कडून अशी अपेक्षा नव्हती, त्यामुळे आमदार आलेक्सबाब नाराज झाल्याचे बोलले जात आहे. ∙∙∙

आता विजय गप्‍प का?

‘जॉब स्‍कॅम’ प्रकरणात सहभागी असलेला मंत्री विद्यमान मंत्रिमंडळात आहे. असा मंत्री आपल्‍या मंत्रिमंडळात नसल्‍याचे मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगावे, अन्‍यथा आपण त्‍या मंत्र्याच्‍या नावासह पुरावेही सादर करू, असा इशारा आमदार तथा गोवा फॉरवर्डचे अध्‍यक्ष विजय सरदेसाई यांनी चार दिवसांपूर्वी दिला होता. त्‍यानंतर मुख्‍यमंत्र्यांनी या प्रकरणात नव्‍याने एफआयआर दाखल करून सखोल चौकशीचे आदेश पोलिसांना दिले. पूजा नाईकनेही नव्‍याने नोंदवलेल्‍या जबाबात दोन अधिकाऱ्यांची नावे घेतल्‍याचे समोर आले आहे. पण, मुख्‍यमंत्री किंवा पोलिस त्‍यांची नावे फोडत नाहीत. अशा स्‍थितीतही विजय सरदेसाई जनतेला दिलेला शब्‍द का पाळत नाहीत? संबंधितांची ते थेटपणे नावे का घेत नाहीत? असे प्रश्‍‍न मतदारांकडून विचारले जात आहेत. ∙∙∙

गोवा डेअरीची अशीही कथा

भाऊसाहेब बांदोडकर यांनी गोव्याच्या भवितव्याचा विचार करून जे अनेक प्रकल्प वा योजना त्यांच्या काळांत सुरु केल्या वा त्यांचा पाया घातला त्यांत गोवा डेअरीचाही समावेश होता. अगदी हल्ली पर्यंत ती डेअरी चांगली चालत होती. पण ज्या अनेक सहकारी संस्थांचे झाले तेच म्हणे गोवा डेअरीचेही झाले. त्यावर निवडून आलेले वा सरकार नियुक्त संचालक यांनी ही संस्था आपल्या पायावर कशी उभी राहेल ते पहाण्याऐवजी तिची आर्थीक बाजू डबघाईस कशी येईल त्यावर भर दिला. या डेअरीशी संलग्न विविध योजना त्यामुळे मूळच धरूं लागलेल्या नाहीत तशातच आता या संस्थेच्या कर्मचा-यांनी सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसींची मागणी केल्यावर सरकारने त्या सेवेला अस्मा लागू केला. पण तो लागू करण्यात जी तत्परता दाखवली ती डेअरीचा गाडा जाग्यावर घालवण्यासाठी दाखवली असती तर ही वेळ आलीच नसती असे डेअरीशी संबंधित मंडळी म्हणत आहेत.∙∙∙

‘तो’ मंत्री, ‘ते’ अधिकारी कोण?

‘जॉब स्‍कॅम’ प्रकरणात आपण मंत्री, आयएएस अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम खात्‍याच्‍या (पीडब्‍ल्‍यूडी) अभियंत्‍याला १७ कोटी रुपये दिल्‍याचा दावा या प्रकरणातील मुख्‍य आरोपी पूजा नाईक हिने केल्‍यानंतर राज्‍यात खळबळ माजली. चोवीस तासांत संबंधितांनी पैसे परत न केल्‍यास त्‍यांची नावे उघड करण्‍याचाही इशारा तिने दिला होता. पण, त्‍याआधीच (शिताफीने) क्राईम ब्रांचने तिची चौकशी सुरू करून तिच्‍याकडून नव्‍याने जबाबही नोंदवून घेतला. नव्‍या जबाबातही पूजाने दोन अधिकाऱ्यांची नावे दिलेली आहेत. पण, सरकारच्‍या मान्‍यतेनंतरच संबंधित अधिकाऱ्यांविरोधात एफआयआर नोंदवण्‍याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. अशा स्‍थितीत ‘तो’ मंत्री आणि ‘ते’ दोन अधिकारी कोण? असा प्रश्‍‍न सर्वांनाच पडला आहे. नोकऱ्यांच्‍या बाबतीत सर्वात जास्‍त भ्रष्‍टाचार कोणत्‍या खात्‍यात होतो? पूजा ज्‍या सालांचा उल्लेख करीत आहे, त्‍या सालांत कोण मंत्री होते? यासह त्‍यातील कोणकोणते मंत्री विद्यमान मंत्रिमंडळात आहेत? त्‍यांचे कोणकोणत्‍या अधिकाऱ्यांशी लागेबांधे आहेत? हे बहुतांशी जनतेला माहीत आहे. मंगळवारी तर नाक्यानाक्यावर लोक ‘त्या’ मंत्र्याचे नाव घेत होते!, तरीही पोलिस त्‍यांची नावे का उघड करीत नाही? असा सवाल जनता विचारत आहे. ∙∙∙

हे सारे नव्या प्रकल्पासाठी का?

मडगावची एक खासियत म्हणजे येथे मोकळी जागा रहाणार नाही याची खबरदारी राजकारण्यांच्या साथीने बिल्डर घेत असतात. त्यातह मजेची बाब म्हणजे नगरनियोजन खाते चिंचोळा पट्टा असला तरी त्यांना तेथे परवाना देते. शहराच्या पूर्व बगलरस्त्यावर मारुती मंदिर व मारुतीनगर रस्ता याच्या मधोमध कचरा संकलन केंद्र गेली अनेक वर्षे कार्यरत होते. पण अकस्मात ते बंद केले गेले व तेथे मातीचा भऱाव घातला गेला आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. काहीजण तर तेथे एखादा बांधकाम प्रकल्प येणार असे सांगू लागले आहेत. कारण या रस्त्याच्या दुतर्फा दवर्ली जंक्शनपर्यंत अगदी रस्त्याला भिडून (सेटबॅक न सोडता) नवनवे प्रकल्प सध्या उभे रहात आहेत त्यांत आणखी एकाची भर पडेल, असेही म्हटले जात आहे. मात्र कचरा संकलन केंद्र स्थलांतरित करण्यामागे कोणाचा हात आहे, याचे कोडे मात्र सुटलेले नाही.∙∙∙

धारगळमध्ये चुरस

धारगळचे पंच भूषण नाईक यांनी आपण जिल्हा पंचायत निवडणूक लढवणार असे म्हटले आहे. त्यानंतर आता सामाजिक कार्यकर्ते भारत बागकर यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे या मतदारसंघातील रंगत वाढणार हे निश्चित आहे. आणखीनही काहीजण येत्या काही दिवसात आपले मनसुबे जाहीर करतील, अशी चर्चा आहे. पेडण्यात नवे चेहरे राजकारणात हवेत, अशी चर्चा आहे. त्याचमुळे बागकर यांनी उमेदवारीसाठी होकार दिल्याचे सांगितले जाते.∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Film Industry: कोकणी सिनेमा बनवायचा झाल्यास 'कोटी' रुपये गोव्यातील निर्माता कोठून आणेल?

IFFI Golden Peacock Award: कुणाला मिळणार 'गोल्डन पिकॉक' अवॉर्ड? उत्सुकता शिगेला..

Karapur Sarvona: ..आणि 'तो' मीटिंगमधून पळाला! कारापूर-सर्वण पंचायतीत गोंधळ; 2 महिला पंचसदस्‍यांना शिवीगाळामुळे गदारोळ

Goa Crime: सावत्र बाप निघाला 'नराधम'! 20 महिने अल्पवयीन मुलाचा लैंगिक छळ; दिली जीवे मारण्याची धमकी

Camurlim: ..परवाना नाही, तरीही झाडे तोडली! कामुर्ली ग्रामसभा तापली; सरपंचांचा FIRचा इशारा

SCROLL FOR NEXT