गोवेकरांना आता 'मोपा'च्या उद्धाटनाचे वेध लागले आहेत. मुख्यमंत्र्यांनी याबाबत माहिती देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर खुलासा करतील असे म्हटले आहे. मात्र मोपाला नाव कोणाचे? या प्रश्नाचे उत्तर अस्पष्ट आहे. त्यामूळे मनोहर पर्रिकर यांचे नाव देता येईल का? असा ही एक मतप्रवाह आहे. या पार्श्वभूमीवर मोरजी ग्रामस्थांनी मोपा विमानतळाला भाऊसाहेब बांदोडकर यांचे नाव द्यावे असा ठराव पास केला आहे.
(morjim Gram Sabha passed a resolution to name Mopa Airport after Bhausaheb Bandodkar)
मिळालेल्या माहितीनुसार आज मोरजी ग्रामसभा पार पडली या ग्रामसभेत अनेक विषयावर चर्चा झाली असली तरी यापैकी मोपा विमानतळाला भाऊसाहेब बांदोडकर यांचे नाव द्यावे असा ठराव निवृत्ती शिरोडकर यांनी ग्रामसभेत मांडला. हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
यावेळी पारंपारिक पायवाटा मोकळ्या कराव्यात, वीज समस्या, नागरिकांना समोरे जावे लागत असलेली पाणी टंचाई, ग्रामपंचायत परिसरात होत असलेली रस्त्यावरील अतिक्रमणे यावर ही चर्चा झाली असून या प्रश्नांसाठी आपल्याकडे काय विकास आराखडा आहे. तो या सभेत नागरिकांना समजू द्या असे ही नागरिकांनी म्हटले.नागरिकांनी अनेक प्रश्नांवर चर्चा केली. तरीही मोपाला भाऊसाहेबांचे नाव द्या या प्रस्तावावर सर्वांचे एकमत झाले.
यावेळी काही नागरिकांनी ठराविक लोक ग्रामपंचायत हद्दीत अतिक्रमण करत आहेत. रोज हा प्रकार सुरु आहे. त्यांना कोणीही विचारत नाही. ग्रामपंचायत म्हणून आपण हा अतिक्रमणाचा मुद्दा निकालात काढणे अपेक्षित असताना तो तसाच का भिजत पडला आहे? याचा फायदा ठराविक वर्ग उचलतो आहे. तर आपण कारवाई का करत नाही ? असा सवालही पंचांना विचारला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.