Morjim Gawdewada Road becomes Death Trap Dainik Gomantak
गोवा

मोरजी गावडेवाडा रस्ता मृत्यूचा सापळा

मोरजी पंचायत क्षेत्रातील दाभोळकरवाडा ते गावडेवाडा किनारी भागात जाणारा रस्ता अत्यंत धोकादायक बनला आहे. त्‍यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून वाहने चालविणे कठीण बनले आहे.

दैनिक गोमन्तक

मोरजी : मोरजी पंचायत क्षेत्रातील दाभोळकरवाडा ते गावडेवाडा किनारी भागात जाणारा रस्ता अत्यंत धोकादायक बनला आहे. त्‍यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून वाहने चालविणे कठीण बनले आहे.

त्‍यातच या अरुंद रस्त्यावर मागच्या सहा महिन्यांपूर्वी कवाथे लावून कोणी तरी अडथळा निर्माण केलेला आहे. हा रस्ता सार्वजनिक आहे की खाजगी, याचा खुलासा सार्वजनिक बांधकाम खात्याने करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

मोरजी पंचायत क्षेत्रातील दाभोळकरवाडा ते गावडेवाडापर्यंत जाण्यासाठी पूर्वी रस्ता नव्हता. गुडघाभर पाण्यामधून वाट काढत ग्रामस्थांना जावे लागायचे. याची दखल घेऊन सरपंच सतीश शेटगावकर यांनी जमीनमालकाशी चर्चा करून रस्ता करून घेतला. सुरुवातीला सहा मीटरचा हा रस्‍ता नंतर तीन मीटर रस्ता करण्यात आला.

परंतु ज्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत, त्‍यांना आजपर्यंत एकही पैसा मिळालेला नाही. हा रस्ता झाल्यानंतर किनारी भागाचा मोठ्या प्रमाणात विकास होत गेला. अनेक बांधकामे, हॉटेल्स उभी राहिली. या अरुंद रस्त्यावरून मोठी अवजड वाहनेही जाऊ लागली. त्यामुळे कच्चा असलेला हा रस्ता मोठ्या वाहनांचे धक्के बसून निकामी होत चालला आहे. सध्या मोठमोठे खड्डे रस्त्यावर पडलेले आहेत.

सहा मीटरचा रस्‍ता नंतर तीन मीटर कसा झाला?

या रस्त्याच्या बाजूलाच एका कूळमालकाने कवाथे लावले. त्‍यामुळे वाहतुकीला अडथळे निर्माण झाले. अगोदर सहा व नंतर तीन मीटर झालेल्‍या या रस्‍त्‍याच्‍या उर्वरित जमिनीत आता हॉटेल प्रकल्प उभा राहणार आहे.

त्या हॉटेल प्रकल्पाला मान्यता मिळवण्यासाठीच टीसीपीला अगोदर सहा मीटर रुंदीचा रस्ता दाखवणे आवश्यक होता आणि तो दाखविल्यानंतर या प्रकल्पाला मान्यता मिळालेली आहे. परंतु आता त्‍या तीन मीटर जमिनीत कवाथे लावण्यात आले आहेत शिवाय काही बांधकाम साहित्यही आणून टाकण्‍यात आलेले आहे. टीसीपीची दिशाभूल करण्‍याचा हा प्रयत्‍न आहे, असा आरोप नागरिकांतून करण्‍यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Disneyland In India: भारतात होणार ‘डिस्नेलँड’, 500 एकर परिसरातल्या थीम पार्कला ‘या’ राज्याने दिली मंजुरी

Crocodiles Viral Video: हा कसला वेडेपणा! चक्क मगरीला दुचाकीवर घेऊन प्रवास, व्हिडिओ पाहून म्हणाल, खतरनाक...

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Raj - Uddhav Thackeray: मुंबईत दुमदुमला 'आवाज मराठी'चा; 20 वर्षानंतर राज - उद्धव एकत्र

"हॉटेलचं जेवण चाखल्यावर घरचं आवडेल का?" प्रेमानंद महाराजांनी सांगितलं तरुणांच्या घटस्फोटांचं मुख्य कारण; Watch Video

SCROLL FOR NEXT