Goa Court Verdict Dainik Gomantak
गोवा

Morjim: ...तोपर्यंत ‘त्‍या’ स्मशानभूमीचा वापर नको! न्यायालयाचे निर्देश; मोरजी पंचायतीला धक्का

Morjim Cemeter: मोरजी पंचायत क्षेत्रासाठी निश्चित करण्यात आलेल्या स्मशानभूमीच्या स्थळाचा वापर सर्व परवानग्या आणि मंजुरी मिळेपर्यंत करता येणार नाही, असा स्पष्ट आदेश गोवा खंडपीठाने दिला आहे.

Sameer Panditrao

पणजी: मोरजी पंचायत क्षेत्रासाठी निश्चित करण्यात आलेल्या स्मशानभूमीच्या स्थळाचा वापर सर्व परवानग्या आणि मंजुरी मिळेपर्यंत करता येणार नाही, असा स्पष्ट आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिला आहे. पर्यटन संचालकांनी यापूर्वी ग्रामपंचायतीस दिलेले ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) मागे घेतल्याने, पंचायतीला मोठा धक्का बसला आहे.

सदर अवमान याचिका सामाजिक कार्यकर्ते संजय रिलन यांनी दाखल केली होती. त्यांच्या मते, १३ मार्च व २१ जून २०२४ रोजीच्या न्यायालयीन आदेशांचे उल्लंघन पर्यटन संचालकांनी केले होते.

मात्र, संचालक केदार नाईक यांनी न्यायालयात सादर केलेल्या निवेदनानुसार २३ जानेवारी २०२४ रोजी दिलेली ‘एनओसी’ त्वरित प्रभावाने रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे न्यायालयाने ही अवमान याचिका निकाली काढली.

न्यायालयाने ग्रामपंचायतीस त्या स्थळावर कोणतेही अंत्यसंस्कार न करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पोलिसांना देखील या जागेवर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. पूर्वी न्यायालयाने गोवा किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणास (जीसीझेडएमए) कासवांच्या अंडी घालण्यावर स्मशानभूमीच्या कामांचा परिणाम तपासूनच निर्णय घेण्याचे आदेश दिले होते.

अशी आहे वादाची पार्श्वभूमी

संजय रिलन यांची अवमान याचिका

१३ मार्च व २१ जून २०२४चे आदेश उल्लंघन झाल्याचा आरोप

कासवांच्या अंडी घालण्यावर परिणाम तपासण्याचे आदेश

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Modi Cabinet Reshuffle: मोदी मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाचे संकेत, कोणाचे पद जाणार, कोणाची लागणार लॉटरी? तरुणांवर मोठा डाव

Goa Smart Meter Protest: जोपर्यंत अधिसूचना निघत नाही, तोपर्यंत...! स्मार्ट मीटरविरोधात पाटकरांची जनतेला थेट आंदोलनाची हाक; विद्युत भवनावर महामोर्चा

खरी कुजबुज: कोकणी शिक्षणाचा बट्ट्याबोळ

Pakistan Statement Controversy: "पाकिस्तान आम्हाला प्रिय'', अमेरिकन उपराष्ट्राध्यक्षांच्या वक्तव्यावर रिपब्लिकन सिनेटर्सचा हल्लाबोल, म्हणाले, 'आधी तुमचे खरे मित्र ओळखा!'

Usgao Leopard Incident: काळ आला होता पण वेळ आली नव्हती! उसगावात धावत्या बाईकसमोर आला बिबट्या; अपघातात सत्तरीचे दोन तरुण जखमी

SCROLL FOR NEXT