मोरजी: पर्यटन हंगामाला सुरुवात होत असतानाच मोरजी समुद्रकिनारी मोकाट गुरे आणि भटक्या श्वानांचा वावर वाढल्याने पर्यटकांसह स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. संबंधित यंत्रणांनी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी व्यावसायिकांनी केली आहे.
याबाबत बोलताना सामाजिक कार्यकर्ते अल्बर्ट फर्नांडिस यांनी सांगितले की, समुद्रकिनारी मोठ्या संख्येने गुरे ठाण मांडून बसत असून, काही गुरांचे कळप पर्यटकांच्या सनबेडजवळ पोहोचतात.
त्यामुळे पर्यटकांच्या विश्रांतीत व्यत्यय येतो, तसेच किनाऱ्यावर ये-जा करताना अडथळे निर्माण होतात. या परिसरात भटक्या श्वानांचाही मोठ्या प्रमाणात वावर आहे. काही विदेशी पर्यटक त्यांना खाद्यपदार्थ देतात. मात्र, हेच श्वान काही वेळा पर्यटकांचा पाठलाग करतात किंवा चावा घेतात.
पर्यटन हंगामात किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी वाढत असल्याने या समस्येकडे दुर्लक्ष करता येणार नाही. मोकाट गुरांच्या मालकांची जबाबदारी निश्चित करावी, तसेच भटक्या श्वानांच्या समस्येवर प्राण्यांना इजा न पोहोचवता उपाययोजना कराव्यात.
- अल्बर्ट फर्नांडिस,
सामाजिक कार्यकर्ते (मोरजी)
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.