Mandre Beach Dainik Gomantak
गोवा

Silent Zone Or Commercial Zone: मोरजी, मांद्रे सायलेंट झोन किनारा कमर्शियल झोन जाहीर

व्यावसायिकांतून आनंद पण स्थानिकांतून संताप; नाराजीचा सूर

गोमन्तक डिजिटल टीम

Silent Zone Or Commercial Zone: मोरजी : सरकारने आणि पर्यावरण विभागातर्फे मोरजी आणि मांद्रे हे किनारे संवेदनशील आणि सायलेंट झोन म्हणून जाहीर केले होते. आता सरकारने राजपत्रात मांद्रे आणि मोरजी हे कमर्शियल झोन जाहीर केल्यामुळे एक प्रकारचा संताप आणि नाराजीचा सूर ऐकायला मिळत आहे.

सरकारच्या राजपत्रात 13 जानेवारी 2022 च्या पान क्रमांक 971 मध्ये मोरजी व मांद्रे हा कमर्शियल झोन जाहीर केला आहे. त्याचप्रमाणे कलंगुट कांदोळी बागा आगोंदा म्हापसा मार्केट मार्ग असे परिसर कमर्शियल झोन केले आहेत. मोरजी आणि मांद्रे हा सायलेंट झोन असतानाच या ठिकाणी कमर्शियल झोन म्हणून जाहीर केल्यामुळे एकच खळबळ उडालेली आहे.

मोरजी पंचायत क्षेत्रातील किनारी भागात 1999 सालापासून कासव संवर्धन मोहीम राबवली जाते. ही मोहीम यशस्वीपणे चालू आहे. 2000 मध्ये सरकारने टेम्ब वाडा किनारी भागात एकूण पाचशे चौरस मीटर जागा ही कासव संवर्धन मोहिमेसाठी आरक्षित केली गेली. त्या ठिकाणी कसल्याच प्रकारचे सॅक व्यावसायिक कुटीरे उभारण्यास सरकार परवानगी देत नाही. हळूहळू आश्वे मांद्रे या ठिकाणीही कासव येऊन अंडी घालू लागल्याने हाही परिसर आता सायलेंट झोन म्हणून सरकारने त्या काळात जाहीर केला होता. परंतु 13 जानेवारी रोजी सरकारने राजपत्रात मांद्रे आणि मोरजी हे दोन्ही किनारी कमर्शियल झोन केल्यामुळे पर्यटन व्यवसायाशी निगडित असलेल्यांना अत्यंनंद झाला आहे.

एका बाजूने मांद्रे मोरजी किनारी भागात पर्यटन हंगामात मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होत असते. यावर नियंत्रणासाठी ध्वनी प्रदूषण नियंत्रण समिती कार्यरत आहे. संबंधित अधिकाऱ्यांना कळवणे किंवा लेखी स्वरूपात तक्रार देणे हे काम समिती करत आहे.

नुकतीच उत्तर गोवा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ध्वनी प्रदूषण नियंत्रण समितीची एक विशेष बैठक झाली. या बैठकीला पेडणे उपजिल्हाधिकारी, बारदेश उपजिल्हाधिकारी डिचोली उपजिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक पोलीस उपअधीक्षक यांची उपस्थिती होती. यावेळी सायलेंट झोन असलेले किनारे अचानक कमर्शियल झोन कसे जाहीर केले, असा सवाल समितीचे सदस्य प्रसाद शहापूरकर निवृत्ती शिरोडकर यांनी विचारला. त्यावर याविषयी माहिती उपलब्ध झालेली नाही, असे सांगण्यात आले. विशेष बैठक घेऊन त्यावर स्पष्टीकरण देण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UTAA: गोविंद गावडे, वेळीप यांनी स्वार्थासाठी संघटनेचा वापर केला! शिरोडकरांचा हल्लाबोल; हुकूमशाही कारभाराचा आरोप

Goa Politics: खरी कुजबुज; साडेसहा कोटींच्या मंडपाचा शोध!

Pandharpur Wari: पावलो पंढरी वैकुंठ भुवनी! वैष्णवांचा मेळा डेरेदाखल, 15 लाख भाविकांची मांदियाळी

Babu Ajgaonkar: 'माझे कितीही पुतळे जाळा, मी 2027 ची निवडणूक लढवणारच'! बाबू आजगावकरांचा निर्धार

Anmod Ghat: अनमोड घाटाबाबत नवी अपडेट! अवजड वाहतुकीसाठी रस्ता राहणार बंद; 'या' वाहनांना मिळणार सूट

SCROLL FOR NEXT