Morjai Temple Case Dainik Gomantak
गोवा

Morjai Temple Case: मोरजाई देवस्थानच्या मालमत्तेत अपहाराचा आरोप! माजी अध्यक्षासह दोघांना अटक; मांद्रे पोलिसांकडून गुन्हा दाखल

Morjai Temple Property Misappropriation: देवस्थानचे विद्यमान अध्यक्ष रामनाथ शेटगावकर यांच्या तक्रारीनुसार, संबंधित पदाधिकारी २३ मार्च २०२५ पर्यंत व्यवस्थापन समितीवर कार्यरत होते.

गोमंतक ऑनलाईन टीम

मोरजी: येथील श्री देवी मोरजाई देवस्थान आणि संलग्न संस्थानच्‍या मालमत्तेचा गैरवापर व अपहार केल्याच्या आरोपावरून देवस्थानच्या माजी अध्यक्षासह तत्कालीन व्यवस्थापन समितीतील सदस्यांविरुद्ध मांद्रे पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणी गोपाल गणेश शेटगावकर आणि लक्ष्मीकांत अर्जुन शेटगावकर या दोघांना अटक करण्यात आली असून, प्रकृती अस्वास्थ्यामुळे सध्या त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

देवस्थानचे विद्यमान अध्यक्ष रामनाथ शेटगावकर यांच्या तक्रारीनुसार, संबंधित पदाधिकारी २३ मार्च २०२५ पर्यंत व्यवस्थापन समितीवर कार्यरत होते. त्यांच्या ताब्यात देवस्थानचे दागिने, लेटरहेड, अधिकृत शिक्का, इतिवृत्त पुस्तके, महाजनांची यादी, पावती पुस्तके, बँक पासबुक, चेकबुक, फंडपेटी, मंदिराच्या चाव्या तसेच मालमत्ता आणि न्यायालयीन प्रकरणांशी संबंधित कागदपत्रे होती.

या मालमत्तेचा गैरवापर व अपहार झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. देवस्थान व्यवस्थापन समितीच्या अर्जावर प्राथमिक चौकशी केल्यानंतर मांद्रे पोलिस निरीक्षक व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून वरील दोघांवर भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१६(२), ३१६(५) सह ३(५) अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Electricity: गोव्यात 80 मेगावॅट वीजटंचाई; उद्योगांना भारनियमनाचा धोका, बैठकीतही तोडगा नाही

विकासाचे आकडे वाढले, मग गोमंतकीय सुखी का नाहीत?; निवडणुकीआधी जनतेच्या अपेक्षांचा हिशेब मांडण्याची वेळ

संपादकीय: आमची मते कुठे गेली?

Chandra Gochar 2026: 4 राशींसाठी सुरू होणार 'गोल्डन टाइम'! कर्क राशीत चंद्राच्या प्रवेशाने धनलाभाचे योग, नशीबही देणार साथ

Goa Development: 2014नंतर गोव्याचा 'आश्‍चर्यकारक' विकास; झुआरी पुलाची रचना पाहून शिवराजसिंह चौहान भारावले

SCROLL FOR NEXT