वास्को: माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते पायाभरणी केलेल्या मुरगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकारी बंगल्याच्या जागी 'सुवर्ण महोत्सवी प्रकल्प' भंगार अड्ड्या बरोबर कचरा प्रकल्प होत चाललेला आहे. राज्य सरकारने स्व.पर्रीकर यांच्या हस्ते झालेल्या पायाभरणी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी गोवा प्रदेश काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष नजीर खान यांनी केली आहे. तसेच मुरगाव नगरपालिकेने सुवर्णमहोत्सवी प्रकल्पाकडे कधीच गंभीरतेने पाहिलेले नसल्याने गेली दहा वर्षे हा प्रकल्प उभा होत नसल्याची खंत नजीर खान यांनी व्यक्त केली आहे.
(Morgaon Municipality ignores 'Golden Jubilee Project')
मुख्यमंत्री दिगंबर कामत सरकारच्या कार्यकाळात सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त राज्यातील सर्व पालिकेना कोटी रुपयाचा निधी पालिका उभारण्यासाठी देण्यात आला होता. याच उद्दिष्टाने वास्को येथील मुरगाव नगरपालिकेने राज्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या शुभहस्ते पालिका मुख्याधिकाऱ्यांच्या बंगल्याच्या जागी व्यवसायिक इमारत बांधण्यासाठी पायाभरणी २७ जुलै २०१३ रोजी केली होती. मात्र दहा वर्षे पूर्ण व्हायला आली तरीही प्रकल्प उभारता येत नसल्याने गोवा प्रदेश काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष नजीर खान यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
सदर प्रकल्पाला कामत सरकार तर्फे पालिकेचा दर्जा पाहून मुरगाव नगरपालिकेला तीन कोटी रुपये मंजूर करून मुरगाव नगरपालिका तिजोरीत जमा सुद्धा केले होते. पण सुवर्णमहोत्सवी प्रकल्पाला चांगला मुहूर्त सापडत नसल्याने अजूनही प्रकल्प रखडत चालला आहे. अनेक वेळा मुरगाव नगरपालिकेतर्फे निविदा काढून सुद्धा प्रकल्पाचे काम पुढे जात नसल्याने अखेर सुवर्णमहोत्सवी पालिकेच्या प्रकल्पावर भंगार वाहने व कचरा टाकून एका प्रकारे कचरा प्रकल्प करून ठेवला असल्याची माहिती नजीर खान यांनी दिली.
राज्य नगरविकास मंत्री, पालिका संचालकांनी मुरगाव नगरपालिकेच्या सुवर्णमहोत्सवी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी नजीर खान यांनी केली. तसेच मुरगाव नगरपालिकेत सुद्धा सुवर्णमहोत्सवी प्रकल्पासाठी गंभीरतेने विचार करून काम मार्गी लावावे अशी मागणी खान यांनी केली. वास्को मासळी मार्केटमधील काही भाजी विक्रेत्यांचा प्रश्न अजूनही सुटलेला नसल्याने पालिकेने हा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा. नजीर खान यांनी कधीच स्वतःसाठी कार्य केले नाही तर वास्को वासियांच्या भल्यासाठी कार्य केले आहे.
शहरी भागातील नगरसेविकिने माझ्यावर आरोप करण्यापूर्वी स्वतः किती प्रकल्पासाठी पुढाकार घेतला याची माहिती द्यावी. कोणावरही आरोप करण्यापूर्वी अभ्यास करण्याचा सल्ला नजीर खान यांनी शहरी विभागातील नगरसेविकेला दिला. वास्को शहरात आज पर्यंत बारा प्रकल्पाची पायाभरणी झाली मात्र येथील एकही प्रकल्प पूर्ण झाले नसल्याची खंत शेवटी नजीर खान यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांच्यासमवेत अल्पसंख्यांक विभागाचे अल्बिनो अरावजो, साजीद खान व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.