Senior Citizens in Goa Dainik Gomantak
गोवा

South Goa : दक्षिण गोव्यात एक हजार ज्येष्ठ नागरिक जगतात एकाकी जीवन

पोलिस सर्वेक्षण : 475 जोडपी; एकूण 1950 जणांचा समावेश

दैनिक गोमन्तक

मडगाव : दक्षिण गोवा जिल्ह्यात एकूण 1950 ज्येष्ठ नागरिक वास्तव्य करून आहेत. त्यातील 1006 घरात एकटेच राहतात तर 475 जोडपी राहतात, असे एका पोलिस सर्वेक्षणात आढळून आले आहे.

1950 पैकी 60 ते 69 गटात 784 तर 70 ते 79 या वयोगटात 840, 80 ते 90 या गटातील 279 व 90 ते 99 या गटातील 46 व्यक्ती आहेत. शतक पार केलेलीही व्यक्ती आहे. दक्षिण गोवा जिल्ह्यात चौदा पोलिस स्थानके मोडतात. या चौदापैकी पाच पोलिस स्थानकांत 1077 ज्येष्ठ नागरिक मोडतात. सर्वाधिक 334 ज्येष्ठ नागरिक किनारपट्टीत राहतात. त्यात 69 जोडपी तर 196 व्यक्ती आहेत.

मडगावात 112 एकाकी तर 49 जोडपी राहतात. मायणा-कुडतरीत 110 एकाकी तर 65 जोडपी, कुंकळ्ळीत 50 एकाकी व 45 जोडपी, फातोर्डात 77 एकाकी व 41 जोडपी, केपेत 49 एकाकी व 12 जोडपी, कुडचडे 71 एकाकी व 27 जोडपी, सांगेत 42 एकाकी व दोन जोडपी, काणकोणात 84 एकाकी व 36 जोडपी, मोठ्या शहरात मोडणाऱ्या वास्कोत केवळ 28 जण एकाकी राहतात, त्याचबरोबर 27 ज्येष्ठ नागरिक जोडपी आहेत. वेर्णा पोलिस स्थानक कक्षेत हे प्रमाण अनुक्रमे 52 व 48 असे आहे. मुरगावमध्ये ते प्रमाण अनुक्रमे 11 व 4, फोंड्यात 94 व 43 तर कुळे येथे ते 30 व 7 असे आहे. ही आकडेवारी जून 2022 अखेरची आहे व सर्व वयोगटांतील ज्येष्ठ नागरिकांशी संपर्कास प्रारंभ झालेला आहे, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.

पोलिसांनी राबवलाय विशेष कार्यक्रम

जिल्ह्यातील विविध भागांत वास्तव्य करून असलेल्या या लोकांसाठी दक्षिण गोवा पोलिसांनी एक विशेष कार्यक्रम राबवला आहे. त्यानुसार पोलिसांनी या लोकांशी जवळीक साधली आहे. पोलिस अधिकारी व संबंधित स्थानकांचे बीट पोलिस या लोकांच्या सतत संपर्कात राहतात. त्यामुळे आपत्कालीन प्रसंगात वा अन्य वेळी ते त्याच्या मदतीस धावून जाऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT