Goa Forest Fire Video Dainik Gomantak
गोवा

Video: गोव्यात लागलेल्या आग नियंत्रणासाठी तब्बल 25000 लिटरपेक्षा जास्त पाण्याचा वापर; मात्र तरीही...

Kavya Powar

Goa Forest Fire : गोव्यातील जंगलात सतत आग लागण्याच्या घटना घडत आहेत. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य प्रशासनाच्या मदतीला आता भारतीय नौदल सुद्धा धावून आले आहे. Indian Navyच्या हेलिकॉप्टरने 08 मार्च रोजी यासाठी अनेक मोहिमा केल्या असून कुठ्ठाळी आणि मोले इथल्या जंगलात जवळपास 17 टन पाण्याची फवारणी करत ही आग विझवण्याचा प्रयत्न केला. या ऑपरेशनसाठी भारतीय नौदलाचे विशेष हेलिकॉप्टर मदत करत आहे.

भारतीय हवाई दलाच्या Mi-17 या हेलिकॉप्टरने काल 11 मार्चला गोव्यातील जंगलातील आग प्रभावित भागात 25000 लिटरपेक्षा जास्त पाण्याची फवारणी करत ही आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला. याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

इथे पहा हा व्हिडिओ :

दरम्यान, गेल्या आठवड्याभरापासून राज्यात सुरू असलेले अग्नितांडव अद्याप सुरूच आहे. म्हादई अभयारण्यात अजूनही 11 ठिकाणी सक्रिय आग आहे. ही आग शमविण्यासाठी वन विभागासह हवाई, नौदल आणि अग्निशमन दल सक्रिय असले, तरी ही आग विझविण्यात त्यांना यश आलेले नाही.

तथापि, कोपार्डे येथे जंगलाला आग लागल्याप्रकरणी एकनाथ सावंत याला अटक केली आहे. आग दुर्घटनेची पंतप्रधान कार्यालयाने दखल घेतली असून भारतीय वन सर्वेक्षण संस्थेला (एफएसआय) आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी विशेष निर्देश दिले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी आणि पोलिस दल सक्रिय केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: गोवा काँग्रेसच्या प्रभारी सचिवांचा बैठकांचा धडाका; 'त्या' आमदारांना प्रश्न विचारण्याचे आवाहन

Sunburn Festival 2024: त्यांनी कॅप्टनसारखे वागावे, बिनबुडाची विधाने करू नये; ‘सनबर्न’ याचिकेवरुन खंवटेंचे प्रत्त्युत्तर

Goa Live Updates: कुळण-सर्वण येथे विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू

Bhoma Highway: 'भोम प्रकल्प' गोव्याच्या विकासातील महत्त्वाचा टप्पा! भाजपने मानले गडकरींचे आभार

Goa Traffic Department: सावधान! गोव्यात येताय? आता हेल्मेट नसल्यावर होणार 'ही' कारवाई

SCROLL FOR NEXT