ISL football tournament dainikgomantak
गोवा

ISL football tournament : एटीके मोहन बागानला उपांत्य फेरीत गाठण्याची जास्त संधी

ISL football tournament : लिस्टन, मनवीरच्या गोलमुळे माजी विजेत्या बंगळूरच्या स्वप्नास तडा

दैनिक गोमन्तक

पणजी : लिस्टन कुलासोचा प्रेक्षणीय फ्रीकिक गोल, तसेच नंतर मनवीर सिंगने साधलेला अचूक नेम या बळावर एटीके मोहन बागानने आठव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीसाठी दावा आणखीनच भक्कम केला. पराभवामुळे माजी विजेत्या बंगळूर एफसीच्या प्ले-ऑफ फेरीच्या स्वप्नास तडा गेला. (More chances for ATK Mohan Bagan to reach the semi-finals)

फातोर्डा (Fatorda) येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर (Pandit Jawaharlal Nehru Stadium) रविवारी झालेल्या लढतीत एटीके मोहन बागानने 2-0 फरकाने विजय नोंदविला. त्यांचा हा एकंदरीत 18 लढतीतील नववा विजय ठरला. त्यामुळे त्यांचे 34 गुण झाले. स्पर्धेतील आणखी दोन सामने बाकी असल्यामुळे एटीके मोहन बागानला उपांत्य फेरीची जास्त संधी आहे. समान गुण झाल्यानंतर गोलसरासरीत जमशेदपूरने (+13) दुसरा क्रमांक मिळविला असून एटीके मोहन बागानला (+11) तिसरा क्रमांक मिळाला. स्पर्धेत आगेकूच राखण्यास इच्छुक असलेल्या बंगळूरला स्पर्धेतील सातव्या पराभवामुळे धक्का बसला. त्यांचे 19 लढतीनंतर 26 गुण आणि सहावा क्रमांक कायम राहिला. फक्त एक सामना बाकी असल्यामुळे बंगळूर (Bangalore) प्ले-ऑफ फेरीत खेळणार नाही हे स्पष्ट झाले.

पूर्वार्धाच्या भरपाई वेळेत 45+1व्या मिनिटास एटीके मोहन बागानला फ्रीकिक फटका मिळाला. यंदा मोसमात जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या लिस्टनने ताकदवान फटक्यावर बंगळूरचा गोलरक्षक (Goalkeeper) लारा शर्मा याला निष्प्रभ केले. गोमंतकीय आघाडीपटूचा हा स्पर्धेतील आठवा गोल ठरला. नंतर 85 व्या मिनिटास मनवीर सिंग याने बंगळूरच्या गलथान बचावाचा लाभ घेत गोलक्षेत्राबाहेरून मारलेल्या फटक्यावर एटीके मोहन बागानला स्थिती बळकट केली. त्याचा हा मोसमातील सहावा गोल होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Suresh Prabhu: गोवेपण टिकवायचं असेल तर.... ; सुरेश प्रभूंनी सोप्या भाषेत समजावून सांगितलं

Pilgao Farmers Protest: खनिज वाहतुकिचा प्रयत्न हाणून पाडणार, पिळगाव शेतकऱ्यांचे वेदांता विरोधातील आंदोलन तीव्र, ST समाजही सहभागी

Goa Crime: 35.50 लाखांचा घोटाळा; Central Bank Of India च्या व्यवस्थापकाला अटक

Goa Live News Today: लाचखोरी प्रकरणी आयटीडी अधिकाऱ्यांना सशर्त जामीन मंजूर!

Suyash Prabhudessai: गोमंतकीय क्रिकेटप्रेमींची घोर निराशा, अष्टपैलू 'सुयश' IPL मध्ये Unsold

SCROLL FOR NEXT