Mopa Victims Association|Mopa News Dainik Gomantak
गोवा

Mopa Airport: ...तर सरपंचांनी राजीनामे द्यावेत! ‘मोपा’तील नोकऱ्यांवरुन जनसंघटना आक्रमक

Mopa: ग्रामपंचायतींनी आवाज न उठवल्यास ग्रामपंचायत व सरकाराविरुध्द आंदोलन सुरू करणार असा इशारा मोपा पिडीत जनसंघटनेतर्फे पेडणे येथे दिला

गोमन्तक डिजिटल टीम

Mopa International Airport

पेडणे: मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळावर रोजगाराबाबत स्थानिकांना डावलण्यात येत अजून नुकत्याच धावपट्टीवर कचरा गोळा करण्यासाठी आणण्यात आलेल्या गाडीसाठीही परप्रांतीयांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे आता सत्ताधारी पक्षाला पाठिंबा देणाऱ्या ग्रामपंचायतींनी सात दिवसांच्या आत आवाज न उठवल्यास आम्ही ग्रामपंचायत व सरकाराविरुध्द आंदोलन सुरू करणार आहोत, असा इशारा मोपा पिडीत जनसंघटनेतर्फे पेडणे येथे पत्रकार परिषदेत दिला.

या पत्रकार परिषदेला भास्कर नारुलकर, उदय महाले, संदीप कांबळी, महेश तुळसकर व रमाकांत अमेरकर उपस्थित होते. यावेळी भास्कर नारुलकर म्हणाले. की, मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ धावपट्टीवरील कचरा काढण्यासाठी तीन परप्रांतीय उमेदवारांची निवड केली आहे. त्यात स्थानिकांना डावलण्यात आले आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे अनेकदा मोपा विमानतळावर ९९ टक्के रोजगार हा पेडणे तालुक्यातील लोकांना मिळणार असे सांगतात, पण तसे झालेले नाही. त्यामुळे सरकारने मोपा विमानतळावर किती पेडणेकरांना नोकऱ्या दिल्या याची चौकशी करावी. यावेळी संदीप कांबळी, शेतकरी रमाकांत अमेरकर यांनीही आपली कैफीयत मांडली.

...तर सरपंचांनी राजीनामे द्यावे

उदय महाले म्हणाले, की विमानतळाच्या नावावर कवडीमोलाने बेकायदेशीररित्या आमच्या जमिनी बळकावल्या, पण आम्हाला नोकऱ्या किंवा व्यवसाय करू देत

नाहीत. जर जीएमआरआय कंपनी स्थानिक लोकांचा हक्क डावलत असेल, तर त्यांना दिलेले सगळे ना हरकत दाखले मागे घ्यावे. सत्ताधारी पक्षात असूनही विविध पंचायतींच्या सरपंचांना काहीच करता येत नसेल, तर त्यांनी राजीनामे द्यावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT