Mopa truck burning case Dainik Gomantak
गोवा

'मोपा ट्रक जळीतप्रकरणी वाहनमालकांना न्याय देणार'

संजय तुळसकर: नुकसान भरपाई देण्याची कंपनीची ग्वाही

दैनिक गोमन्तक

मोरजी: मोपा विमानतळ परिसरात चार दिवसांपूर्वी पाच ट्रकना आग लागून नुकसान झाले. त्या ट्रकमालकांना नुकसान भरपाई देण्याची ग्वाही मेगावाईड कंपनीने दिली असून ट्रकमालकांनी कागदपत्रे सादर करावीत. तसेच इन्शुरन्सच्या माध्यमातूनही नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्‍वासन कंपनीने दिल्याची माहिती वारखंडचे सरपंच संजय तुळसकर यांनी दिली.

शनिवारी मेगावाईड कंपनीचे अधिकारी आणि नुकसानग्रस्त ट्रकमालकांची संयुक्त बैठक कंपनीच्या आवारात बोलावली होती. त्यानंतर संजय तुळसकर यांनी ही माहिती दिली. वाहनांना आग लागण्याची घटना ज्या दिवशी घडली, त्या दिवशी मोठ्या संख्येने ट्रक उभे करून ठेवले होते. परंतु आगीची घटना घडली, त्यावेळी कुणालाच काहीच कसे कळले नाही, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

कामगारांकडे संशयाची सुई

10 दिवसांपूर्वी झारखंडच्या कामगारांनी मेगावाईड कंपनीने पगार न दिल्यामुळे येथील प्रशासकीय इमारतीवर दगडफेक केली आणि वाहनांचीही मोडतोड केली होती. याप्रकरणी कुणावरही कारवाई झालेली नाही. पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने हे प्रकरण तात्पुरते मिटवले होते. मेगावाईड कंपनीकडे हजारो बिगर गोमंतकीय कामगार आहेत. कंपनीने कामगारांना वेळेवर पगार दिला नसल्याने त्यांनी संतप्त होऊन दगडफेक केली होती. त्यातील काही कामगारांनी या वाहनांना आग लावली नसेल कशावरून? असा संशय व्यक्त केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT