Illegal Sand Mining  Dainik Gomantak
गोवा

Illegal Sand Mining: बेकायदेशीर रेती उपसा केल्याबद्दल सहाजण अटकेत; होडी जप्त

Mopa Police: मोपा पोलिसांच्या कारवाईत दोन मीटर रेती व वापरण्यात येणारी होडी पोलिसांनी ताब्यात घेतली; मालकाविरुद्ध गुन्हा दाखल

गोमन्तक डिजिटल टीम

तारीर-वझरी येथे बेकायदेशीररित्या रेती उपसा केल्याच्या आरोपावरून मोपा पोलिसांनी सहा कामगारांना अटक केली. किनाऱ्यावर काढून ठेवण्यात आलेली दोन मीटर रेती व रेती काढण्यासाठी वापरण्यात येणारी होडीही पोलिसांनी ताब्यात घेतली. ही घटना बुधवारी (ता.१७) सायंकाळी घडली.

होडीचे मालक संजय परब यांच्यावर बेकायदेशीर रेती काढत असल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला. किनाऱ्यावर काढून ठेवलेल्या दोन मीटर रेतीची किंमत ३ हजार रुपये इतकी आहे. मात्र, जप्त केलेली होडी अडीच लाखांची आहे.

बेकायदेशीर रेती उत्खनन आणि चोरीच्या संदर्भात गोवा दमण आणि दीव खनिज नियम १९८५ कलम ३, ३८ आरडब्ल्यू ६२ नुसार मोपा पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अटक कारण्यात आलेले सर्व मजूर हे उत्तर प्रदेशातील वेगवेगळ्या भागातील आहेत. यामध्ये जीवत राजभर (६०, रा. बालियाबंदी, उत्तर प्रदेश), दिनेश राजभर (३६, सतवाज), अर्जुन कुमार राजभर (२४), अशोक राजभर (४५), शहांगूर राजभर (३५), फुलचंद राजभर (४५) यांचा समावेश आहे.

दरम्यान, पेडणे पोलिस स्थानकाचे जिवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली नारायण चिमुलकर व पोलिस सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.

म्हणून सध्या परवानगी नाही!

सध्या राज्यात कोणत्याही नदीतून रेती उपसा करण्यासाठी परवानगी नाही. राज्य सरकारने परवाने देण्यासाठी आवश्यक असणारा पर्यावरण दाखला न घेतल्याने हे परवाने अडले आहेत. केंद्र सरकारच्या पर्यावरण खात्याने नदीपात्रात तीन मीटर खोलवरपर्यंत रेती काढण्यास परवानगी दिली आहे. इतर राज्यांत नदीच्या सुकलेल्या पात्रातून रेती काढली जाते तर गोव्यात नदीच्या पात्रात पाणी असताना रेती काढली जाते. नदीची पात्रे तीन मीटरपेक्षा जास्त खोल झाल्याने राज्य सरकार हे परवाने जारी करू शकत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT