Mopa Airport Jobs|Mopa Jan Sanghatana Dainik Gomantak
गोवा

Mopa Airport: रोजगारात 'स्थानिकांना' प्राधान्य द्या! मोपा जन संघटनेचा इशारा

Mopa News: जीएमआर कंपनीने स्थानिकांना डावलून परराज्यातील उमेदवार घेतले आहेत, त्यांची निवड त्वरित रद्द करून त्या जागी ज्या शेतकऱ्यांच्या शेती बागायत जमिनी या प्रकल्पात गेल्या, त्यातील उमेदवार निवडण्यात यावेत असा इशारा मोपा जन संघटनेचे निमंत्रक उदय महाले यांनी दिला

गोमन्तक डिजिटल टीम

Mopa Locals Protest For Job Preferance At Airport

पेडणे: मोपा विमानतळ प्रकल्पात जीएमआर कंपनीने स्थानिकांना डावलून परराज्यातील उमेदवार घेतले आहेत, त्यांची निवड त्वरित रद्द करून त्या जागी ज्या शेतकऱ्यांच्या शेती बागायत जमिनी या प्रकल्पात गेल्या, त्यातील उमेदवार निवडण्यात यावेत. अन्यथा आम्हाला पुन्हा आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा मोपा जन संघटनेचे निमंत्रक उदय महाले यांनी दिला.

मोपा जन संघटनेतर्फे कासारवर्णे पंचायत कार्यालयासमोर आज धरणे आंदोलन छेडण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या धरणे आंदोलनाला आज राज्याच्या विविध भागांतील समाज कार्यकर्ते व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी भेट देऊन मोपा जन संघटनेला पाठिंबा दिला. त्यात गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर, रामा काणकोणकर, शंकर पोळजी, संजय बर्डे यांचा समावेश होता.

महाले पुढे म्हणाले, की नवी मुंबई येथे विमानतळाचे काम करताना ज्या पद्धतीने रॉयल्टी देण्यात आली, जमीन व घरे गेलेल्यांना जमीन व घरे दिली, त्याच पद्धतीचा मोपा विमानतळासाठीही अवलंब व्हावा. या मागण्यांसाठी मोपा विमानतळ परिसरातील ज्या पंचायती पुढे येत नाहीत, अशा ग्रामपंचायतींसमोर आम्ही धरणे धरणार आहोत.

रामा काणकोणकर म्हणाले, की सरकार ज्याप्रकारे नोकऱ्या दिल्याचे सांगते, पण त्या स्थानिकांना मिळाल्या नाहीत, तर त्या नोकऱ्या कुणाला दिल्या. लोकांच्या मालकीच्या जमिनीत विमानतळ उभारण्यात आला, त्याच लोकांना नोकऱ्यांसाठी रस्त्यावर यावे लागते यासारखेदुर्दैव नाही.

‘नोकऱ्यांसाठी आंदोलन’, ही शोकांतिका

अमित पाटकर म्हणाले, देशात भाजपने गोव्याला बेरोजगारीबाबत एक क्रमांकावर नेऊन ठेवले आहे. मनोहर पर्रीकर यांच्यासह भाजप परिवर्तनाच्या नावाखाली गेली बारा वर्षे लोकांची दिशाभूल करत आहे. मोपा विमानतळ प्रकल्पात जमिनी गेलेल्या पेडणेकरांना आणि ग्राम पंचायतींना नोकरी मागण्यासाठी आंदोलन करावे लागते ही शोकांतिका आहे. न्याय मागणीसाठी आमचा या आंदोलनाला पाठिंबा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT