Manohar Parrikar Son Utpal Parrikar | Mopa International Airport
Manohar Parrikar Son Utpal Parrikar | Mopa International Airport  Dainik Gomantak
गोवा

Utpal Manohar Parrikar : पंतप्रधानांनी ‘मोपा’ विमानतळ बाबांना अर्पण केलाय

आदित्य जोशी

Utpal Manohar Parrikar : मोपा विमानतळाचे स्वप्न 2002 साली माझ्‍या वडिलांनी अर्थात माजी मुख्‍यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पाहिले होते. ते स्वप्न आता सत्यात उतरल्याने आनंदच आहे. मनोहर पर्रीकर यांचे पूर्ण नाव विमानतळाला दिले गेले नसल्याबाबत सरकारला विचारायलाच हवे, परंतु आपल्‍याला नावाच्या वादात स्वारस्य नाही. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सदर विमानतळ मनोहर पर्रीकर यांनाच अर्पण केल्याचे जाहीर केले आहे, असे स्‍पष्‍ट मत मनोहर पर्रीकर यांचे ज्येष्ठ पुत्र उत्पल पर्रीकर यांनी गोमन्तकच्या ‘सडेतोड नायक'' कार्यक्रमात व्‍यक्त केले.

संपादक-संचालक राजू नायक यांनी मनोहर पर्रीकर यांच्‍या जयंतीच्या पूर्वसंध्येला उत्पल पर्रीकर यांची मुलाखत घेतली. ते म्‍हणाले की, आई गेल्यानंतर बाबाच आमचा मोठा आधार बनले. त्यांच्या जाण्यानंतर भीती वाटली. मी स्वतःच्या पायावर उभा राहिलो असलो तरी त्यांच्याशी फारसा संवाद रात्रीचाच व्हायचा. काही निर्णय घेतल्यास ‘आम्ही असे केले आहे’ असे त्यांना सांगावे लागायचे. कारण घरी फारच कमी वेळ त्यांना मिळायचा. तसेच वडील म्हणूनही फार कमी वेळ त्यांच्याकडून आम्हाला मिळाला. लहानपणासून मी राजकारण पाहत आलो आहे. म्हणजेच राजकारणाचे बाळकडूच आम्हाला त्‍यांच्‍याकडून मिळाले असे म्हणता येईल, असे उत्‍पल पर्रीकर म्‍हणाले.

पणजीतील लोक आजही माझ्‍या संपर्कात आहेत. तळागाळातील लोकांच्या समस्या सुटाव्यात असे आपणास वाटते. अनेक गाडेधारकांचा प्रश्‍न अद्याप सुटलेला नाही असे सांगून मनोहर पर्रीकर यांच्‍या मिरामार येथील समाधिस्थळाला झालेल्या विलंबाविषयी उत्पल यांनी सावध भूमिका घेत उत्तर दिले. मोपा विमानतळाबाबत बोलताना ते म्‍हणाले की, या प्रकल्‍पाचा फायदा गोमंतकीय जनतेने करून घ्यायला हवा. येथे पूरक असे व्यवसाय निर्माण करणे आवश्‍यक आहेत. ही एक मोठी संधी आमच्‍यासाठी निर्माण झाली आहे.

...तर निवडणुकीत जिंकलो असतो

‘पर्रीकर’ या आडनावाचा फायदा होतो की तोटा, यावर उत्पल म्हणाले, काहीवेळा फायदा होतो हे निश्‍चित. ‘पर्रीकर’ ही ओळख असल्यानेच निवडणुकीत आपल्याबरोबर अनेकजण राहिले. कमी मतांनी मी पराभूत झालो तरी जी मते मिळाली तो एक फायदाच म्हणावा लागेल. पणजीत विजयाची खात्री असलेल्याच उमेदवाराकडे पाहिले गेले. मला भाजपची उमेदवारी मिळेल असे वाटत होते, पण नाही मिळाली. ‘कमळ’ माझ्याकडे असते तर कदाचित मी निवडूनही आलो असतो, असे उत्‍पल म्‍हणाले.

बालपणीचा सांगितला अनुभव

लहानपणी शाळेत पालकांना बोलाविले जायचे, तेव्हा आम्हाला बाबा येणार नाहीत याची पूर्ण कल्पना असायची. ते गृहीत धरूनच आम्ही शाळेतील समारंभ करत असायचो. परंतु माझ्या मुलाच्या कार्यक्रमाला मी जाऊ शकलो नाही, याची हुरहुर त्‍यांना लागून राहायची असे सांगून प्रत्‍येक मुलाच्‍या आयुष्‍यात वडिलांचे महत्त्व काय असते, हे उत्‍पल यांनी उदाहरणातून पटवून दिले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco News : सहा नद्यांचे राष्ट्रीयीकरण कोळशासाठी : कॅ. विरियातो फर्नांडिस

Lok Sabha Election 2024: ‘’चिदंबरम यांनी भ्रष्टाचार वाढवला, आरबीआयकडून सांगण्यात यायचे...’’; राजीव चंद्रशेखर यांचा हल्लाबोल

Cashew Farmer : निवडणुकीच्या धामधुमीत काजू उत्‍पादक वाऱ्यावर; उत्पादन कमी १६ हजार जणांना फटक

Heavy Rainfall in UAE: मुसळधार पाऊस अन् जोरदार वादळाने UAE पुन्हा बेहाल; उड्डाणे रद्द, इंटरसिटी बस सेवाही ठप्प

Loksabha Election 2024 : शिरोडा मतदारसंघातून धेंपेंना मताधिक्य देणार : मंत्री सुभाष शिरोडकर

SCROLL FOR NEXT