Mopa Taxi Association protest Dainik Gomantak
गोवा

Mopa Taxi Counter : ‘मोपा’वरील टॅक्सी स्टॅन्‍डचा विषय चिघळला; असोसिएशनतर्फे धरणे आंदोलन

कायदा-सुव्यवस्था बिघडल्यास जबाबदारी सरकारची; असोसिएशनचा इशारा

दैनिक गोमन्तक डिजिटल

‘मोपा विमानतळावर अधिसूचित टॅक्सी स्टॅंड तातडीने देण्यात यावा’ या मागणीसाठी दिलेली मुदत संपल्याने आज नागझर येथे मैदानावर ग्रीन फिल्ड मोपा टॅक्सी असोसिएशन व मोपा लोकल टॅक्सी असोसिएशनतर्फे आपल्या टॅक्सी बंद ठेवून धरणे आंदोलन सुरू करण्‍यात आले.

मागणी मान्य झाली नाही तर उद्यापासून रस्त्यावर उतरू व कायदा-सुव्यवस्था बिघडल्यास जबाबदारी सरकारची असेल, असा इशारा यावेळी देण्यात आला आला.

या धरणे आंदोलनात मोठ्या प्रमाणात व्‍यावसायिक सहभागी झाले होते. ‘मोपा विमानतळासाठी जमिनी कवडी मोलाने घेण्यात आल्या. अशा कुटुंबांच्या उदरनिर्वाहासाठी टॅक्सी व्यवसायापोटी हातभार लागावा म्हणून गेल्या चार महिन्यांपासून आम्ही शांततेच्या मार्गाने मागणी व आंदोलन करत आहोत. सरकारला आमच्‍या व्‍यथा कळत नसतील तर दुर्दैव आहे’, असे यावेळी आंदोलनकर्ते म्‍हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT